• Home
  • मनोरंजन
  • कोणीतरी येणार येणार गं…, रणवीर-दीपिका पुन्हा होणार आई-बाबा; लेकीने दिली हटके अंदाजात गुड न्यूज
Top News

कोणीतरी येणार येणार गं…, रणवीर-दीपिका पुन्हा होणार आई-बाबा; लेकीने दिली हटके अंदाजात गुड न्यूज

ranveer deepika

Deepika Padukone Second Pregnancy | अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलिवूडच्या (Bollywood) प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. बॉलिवूडच्या या पॉवरफुल कपलने आता चाहत्यांना गुड न्यूज (Good News) दिली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे दोघं दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. ही खास गुड न्यूज स्वत: दीपिकाने एक फोटो शेअर करत दिली आहे. दीपिका गरोदर असून तिने दिलेल्या या गुड न्यूजने तिच्या आणि रणवीरच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा – रिल्सच्या नादात भीषण अपघात; समृद्धी महामार्गावर बस उलटली, चिमुकल्याचा मृत्यू तर 25 जखमी

दीपिका पदुकोण पुन्हा एकदा होणार आई, शेअर केली खास पोस्ट

दीपिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दीपिकाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रणवीर सिंह हा त्यांची मुलगी दुआला मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहेत. तर या फोटोत रणवीरचा चेहरा दिसत नसून दुआचा अर्धा चेहरा दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोत खास गोष्ट आहे ती म्हणजे दुआच्या हातात असलेले प्रेग्नंसी किट. या फोटोत दुआच्या हातात प्रेग्नंसी किट दिसत आहे.

या फोटोद्वारे दीपिका आणि रणवीरने ते दुसऱ्यांचा आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. तर हा फोटो शेअर करत दीपिकाने दोन नजरबट्टू इमोजी देखील शेअर केले आहेत. मुलगी दुआला जन्म दिल्यानंतर दोन वर्षांनी दीपिका पुन्हा एकदा आई होणार आहे.

दीपिका आणि रणवीरने दिलेल्या या गोड बातमीनंतर त्यांच्यावर चाहत्यांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिका-रणवीरला शुभेच्छा दिल्या आहेत. तर प्रियंका चोप्रा, क्रिती सेनन, भूमी पेडणेकर अशा अनेक सेलिब्रिटींनी रणवीर-दीपिकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts