• Home
  • राजकारण
  • संजय शिरसाट अभिजीत दीपकेंच्या घरी; राजकारणात नवी चर्चा ?
ताज्या बातम्या

संजय शिरसाट अभिजीत दीपकेंच्या घरी; राजकारणात नवी चर्चा ?

Abhijit Dipke

Sanjay Shirsat , Abhijit Dipke : अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात CJP आणि विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर 36 दिवस आंदोलन केलं..सोनम वांगचुक यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण केलं…केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं तर ऐकून घेतलं नाही, मात्र विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्जचा निर्णय घेतला…पोलिसांनी मुला-मुलींना अमानुष मारहाण केली..दिल्ली पोलिसांच्या कृत्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला…मात्र पोलिसांच्या या अमानुष लाठीचार्जवर भाजप किंवा NDA च्या एकाही नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही…पण आता प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर महायुतीचे मंत्री संजय शिरसाट हे अभिजीत दीपकेंच्या घरी पोहोचले आहे…शिरसाट यांनी दीपकेंच्या कुटुंबाची भेट घेत अभिजीत दिपकेंच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे…त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की संजय शिरसाट दीपकेंच्या घरी कोणत्या कारणासाठी गेले आहेत? NDA तील पक्ष असलेल्या शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट दीपकेंच्या घरी गेल्याने आता राजकारणात कोणते पडसाद उमटू शकतात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिरसाट दीपकेंच्या घरी जाणे आवडेल का?

Sanjay Shirsat Abhijit Dipke : संजय शिरसाट अभिजीत दीपकेंच्या घरी का गेले?

अभिजीत दीपके हे तरूणांसाठी अमेरिका सोडून भारतात परतले..त्यांनी भारतात आल्यानंतर तरूणांसाठी लढण्याचे ठरवले आणि पहिलं आंदोलन जंतरमंतरवर केलं..त्यानंतर देशभरात आंदोलनं केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा जंतरमंतरवर आंदोलनाला बसली..अनेक दिवस लढा दिल्यानंतर, पोलिसांचा अत्याचार सहन केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या, CJP च्या आंदोलनाला मोठं यश मिळालं…आता हे आंदोलन संपल्यानंतर देशभरात अभिजीत दीपकेंचं कौतुक होत असताना महायुतीचे मंत्री संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेंच्या घरी पोहोचले आहेत…यावेळी शिरसाट यांनी अभिजीत दीपकेंच्या प्रकृतीची विचारपूस केली..त्यांच्या आई-वडिलांशी भेट घेतली..

हेही वाचा ; मुंबईत ठाकरे बंधूंचा विराट मोर्चा; सरकारवर जोरदार हल्लाबोल.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बदललेलं राजकीय वातावरण :

Sanjay Shirsat : यानंतर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे..अभिजीतला भेटायला अगोदरच यायचं होतं.. मात्र त्याचे राजकीय पडसाद उमटले असते.. त्यामुळे भेट टाळली… अभिजीतला आता मोठं यश मिळालं, तो माझ्या मतदारसंघातील आहे.. आणि माझ्या मतदारसंघातील एखादा तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करतो.. त्यावेळेस त्याला भेटणं माझं कर्तव्य आहे… सरकारने अभिजीतच्या मागण्यांची सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यातून त्याला यश मिळाले, असं संजय शिरसाट म्हणाले…

Abhijit Dipke : अभिजीतला आता मोठं यश मिळालंय, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय..म्हणजे नक्की या वाक्याचा अर्थ काय आहे आणि शिरसाट यांना नक्की काय म्हणायचं आहे…अभिजीत यांनी लढा दिल्यानंतर NDA चे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे..म्हणजे प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच हवा होता..NEET पेपरफुटीत सर्वात जास्त जबाबदार प्रधान हेच आहेत, असं शिरसाट यांना म्हणायचं आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय..कारण अभिजीत यांनी आंदोलन केल्यानंतर NDA च्याच मंत्र्याचा राजीनामा झाला आहे..NDA तील पक्ष असलेल्या शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपकेंना यश मिळाल्याचं म्हटलं आहे..त्यामुळे शिरसाट यांचं हे वक्तव्य वादात सापडण्याची शक्यता आहे..

पुढे बोलताना संजय शिरसाट यांनी विरोधकांवर देखील टीका केली आहे..अभिजीतच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांनी आपल्या पोळ्या भाजून घेण्याचं काम केलंय… अभिजीत येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये घरी येईल
निश्चितच अभिजीत जेव्हा महाराष्ट्रात येईल, त्यावेळेस त्याच्या जीवितेला कुठलाही धोका होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडे त्याला संरक्षण देण्यासाठी मागणी करेल, असंही शिरसाट म्हणाले…

अभिजीत दीपकेंना संरक्षणाची मागणी होणार?

CJP Protest : म्हणजे आता संजय शिरसाट भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिजीत दीपकेंसाठी संरक्षणाची मागणी करणार आहे..ज्या दीपकेंमुळं भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याची विकेट पडली आहे, त्याच दीपकेंना मुख्यमंत्री आता संरक्षण देणार का? हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे…तुम्हाला काय वाटतं ज्या दीपकेंमुळं भाजपला तडे गेले आहेत..गेल्या 12 वर्षांपासून भाजपने कितीही आंदोलनं झाली तरीही एकही मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही..केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की हे UPA नाही NDA आहे आमच्यात मंत्र्यांचा राजीनामा होत नसतो..त्याच भाजपला आज एवढा मोठा धक्का बसल्यानंतर, 12 वर्षात पहिल्यांदा एका मंत्र्याची विकेट गेल्यानंतर, आता फडणवीस अभिजीत दीपकेंना संरक्षण देणार का?

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts