महाराष्ट्रात मे महिन्यापासून पावसाने हाहाकार माजवला असून राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला समोर जावं लागलं आहे. सर्वाधिक पावसाचा फटका मराठवाड्याला पडला होता. त्यामुळे आता मराठवाड्यातील 31.64 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून २ हजार २१५ कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारने ही मदत जाहीर केली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा दिलासा दिला असून आता मराठवाड्यातील 31.64 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटींची नुकसान भरपाई मिळणार आहे. या पावसाने शेतकऱ्यांच 22-25 लाख हेक्टर नुकसान झाले होते. त्यापैकी आता मराठवाड्यासाठी 2215 कोटींची भरपाई देण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून एकूण दीड हजार कोटींच्या आकड्याची मागणी करण्यात आली त्यातील 700 कोटींची मदत यापूर्वीच करण्यात आली होती.
सरकारने जाहीर केलेली हि मदत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मात्रा म्हणून काम करेल असं म्हटलं जात आहे. दरम्यान मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यावर काय निर्णय झाला याची देखील माहिती समोर येण्याची शक्यता आहे.