Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ; पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
ताज्या बातम्या

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ; पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल

Unseasonal Rain | महाराष्ट्रात (Maharashtra) एकिकडे उन्हाची (Summer) चाहूल लागत असतानाच मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ (Vidarbh), मराठवाड्यात (Marathwada) पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. तसेच या पावसाचा जोरदार फटका मराठवाड्याला बसल्याचं दिसत आहे.

हेही वाचा – ईमेल पाठवला तरीही…, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासा, नेमकं घडलं काय?

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जोरदार फटका

प्राथमिक अंदाजानुसार, मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे 19 हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसला आहे. तर विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार, बीड (Beed), लातूर (Latur), परभणी (Parbhani), धाराशिव (Dharashiv) या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावासामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला आहे. यामध्ये दोन जणांना वीज पडून मृत्यू झाला असून चार जनावरे दगावली आहेत. सोबतच 15 हजार 516 हेक्टरवरील पिके बाधित झाली असून यामध्ये 808 हेक्टर बागायत क्षेत्राचा समावेश आहे. तसेच बीडमध्ये 1 हजार 464 हेक्टरवरील बागायत क्षेत्रासह एकूण 3 हजार 409 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts