Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • आता ओला- उबेरला टक्कर? राज्यात ‘सहकार भारत’ टॅक्सी सेवा; मुंबईसह ‘या’ दोन शहरांत लवकरच सुरुवात
Mumbai

आता ओला- उबेरला टक्कर? राज्यात ‘सहकार भारत’ टॅक्सी सेवा; मुंबईसह ‘या’ दोन शहरांत लवकरच सुरुवात

Sahakari Bharat Taxi Service Set to Launch in Maharashtra: आजकाल कुठेही प्रवास करायचा म्हटलं की, नागरिक ऑनलाइन कॅब बुक करतात. वाढता वापर लक्षात घेता राज्यात अॅप-आधारित सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला निर्देश दिले आहेत.

ऑनलाईन कॅब (Cab) सेवांचा वाढता वापर लक्षात घेता राज्यात अॅप आधारित सहकारी टॅक्सी (Sahakari Taxi) सेवा सुरू करण्याच्या हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. ‘सहकार भारत’ टॅक्सी सेवेद्वारे प्रवासी आणि चालक दोघांनाही पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

हेही वाचा: शिवसेना एकत्रीकरणावर ब्रेक? राऊत म्हणाले – आधी मातोश्री, मगच पुढे!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस (Cm- Devendra Fadanvis) यांनी परिवहन विभागाला या अॅप- आधारित टॅक्सी सेवेबाबत आवश्यक नियमावली तयार करण्याचे तसेच परवानग्या देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासंदर्भात अलीकडेच आढावा बैठकही पार पडली असून, योजनेच्या अंलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंबईनंतर पुणे आणि नागपूरमध्ये विस्तार

सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने विस्तार केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शहरी भागात वाढत्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेता ही सेवा महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

चालकांसाठी संधी, प्रवाशांसाठी पर्याय

या सहकारी मॉडेलमुळे टॅक्सी चालकांना अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मध्यस्थांची भूमिका कमी करून चालकांना थेट फायदा मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर प्रवाशांना देखील ओला- उबेरसारख्या सेवांना पर्याय उपलब्ध होणार आहे.

अॅप-आधारित सेवा लवकरच

‘सहकार भारत टॅक्सी को- ऑपरेटिव्ह लिमिटेड’ च्या माध्यमातून ही सेवा अॅपद्वारे सुरू केली जाणार आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर लवकरच ही सेवा प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts