Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अकोल्यातील बोगस दिव्यांग घोटाळा; 33 शिक्षक निलंबित, शिक्षण विभागात मोठी खळबळ
एजुकेशन- जॉब

अकोल्यातील बोगस दिव्यांग घोटाळा; 33 शिक्षक निलंबित, शिक्षण विभागात मोठी खळबळ

Akola Teachers Suspended

Akola Teachers Suspended : अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील बोगस दिव्यांग घोटाळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.. तब्बल 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळवणे, बदल्यांमध्ये प्राधान्य मिळवणे आणि विविध शासकीय सवलतींचा लाभ घेतल्याचे त्रिस्तरीय समितीच्या पडताळणी, चौकशीतून स्पष्ट झाल्याने, 33 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे… एकंदरीत, विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे गुरुजीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या फेऱ्यांमध्ये अडकल्याने गोत्यात आले आहेत…

बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांमुळे शिक्षकांवर मोठी कारवाई ( Akola Teachers Suspended )

या घोटाळ्याची तक्रार करणारे गणेश कुरई यांनी या करवाईनंतर अनेक गंभीर आरोप केले आहेत.. त्यांच्या म्हणण्यानुसार हा घोटाळा लहान नसून याची व्याप्ती संपूर्ण राज्यात पसरली आहे.. केवळ 33 शिक्षकांना निलंबित करण्याचा देखावा प्रशासनाने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.. यामध्ये जिल्हा परिषदेचे मोठे अधिकारी अडकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.. या कारवाईनंतर याचा सातत्याने पाठपुरावा करू असेही त्यांनी म्हटलं आहे..

हेही वाचा : बाप मेला तरी मुलींना वेळ नाही अंत्यविधी व्हिडिओ कॉलवर पाहिला निर्लज्ज मुली, दुर्दैवी बाप!

बदली प्रक्रियेत खोट्या प्रमाणपत्रांचा गैरवापर कसा झाला? ( Fake Disability Certificate )

खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे बदल्यांमध्ये लाभ घेतल्यासोबतच, पती-पत्नी दोघेही दिव्यांग दाखविल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.. बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्यातून तब्बल 1800 शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 948 शिक्षक संवर्ग-1 आणि संवर्ग-2 मध्ये पात्र ठरले होते… संवर्ग-1 मध्येच 808 शिक्षकांचा समावेश होता. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढल्याचे दिसून आले होते… नियमांनुसार संवर्ग-१ चा लाभमिळविण्यासाठी संबंधित शिक्षक किंवा त्यांच्या पती-पत्नीपैकी एकाला शासनाने निर्धारित केलेल्या गंभीर आजारांचा समावेश असल्याने, अनेक शिक्षकांनी कथितपणे खोटी अथवा दिशाभूल करणारी वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केल्याचे स्पष्ट झाले… काही प्रकरणांत दिव्यांगत्वाची संशयास्पद प्रमाणपत्रे जोडण्यात आली आहेत, तर काहींनी पती किंवा पत्नी गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे दाखवून संवर्ग-१ मध्ये प्राधान्य मिळविल्याचेही समोर आले.

आता याप्रकरणात तपास करून योग्य कारवाई केला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवण्याचे सुळसुळाट राज्यभर पसरल्याचे दिसून येत आहे…बोगस प्रमाणपत्र घेऊन फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे…

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts