Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मुंबई कोस्टल रोडवर काळरात्र! भरधाव BMWचा अपघात, तिघांचा मृत्यू; एक तरुण गंभीर
Mumbai

मुंबई कोस्टल रोडवर काळरात्र! भरधाव BMWचा अपघात, तिघांचा मृत्यू; एक तरुण गंभीर

Mumbai Coastal Road Accident
0
Mumbai Coastal Road Accident: मुंबई कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भरधाव BMWचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी आहे.

मुंबईच्या कोस्टल रोडवर रविवार पहाटे झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. मरीन ड्राईव्हकडून हाजीअलीच्या दिशेने जाणाऱ्या BMW कारचा लाला कॉलेज परिसरातील लोटस जेटीजवळ अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. BMW कार वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चौघांना रुग्णालयात दाखल

अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये असलेल्या चौघांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी नायर रुग्णालयात नेण्यात आलं.

हेही वाचा: Salman Khan: सलमान खानच्या छातीत अचानक दुखलं अन् स्टेजवर पडला; चालू शोमध्ये नेमकं काय घडलं? व्हायरल व्हिडिओ आला समोर

डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिघांना मृत घोषित केलं. मृतांमध्ये शानय गज्जल (२१), धिर्या सेठ (१७) आणि २५ वर्षीय एका तरुणाचा समावेश आहे. या तिसऱ्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

अपघातातील आणखी एक २० वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नायर रुग्णालयातील ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू असून डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतलं. BMWची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग किती होता, याचाही तपास केला जात आहे.

तपासाचा एक भाग म्हणून कोस्टल रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहे. वाहनावरील चालकाचं नियंत्रण नेमकं कोणत्या कारणामुळे सुटलं, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

अतिवेगामुळे अपघाताची शक्यता

प्राथमिक तपासात कारचा वेग जास्त असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असून तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

मुंबईतील कोस्टल रोडवर पहाटे आणि रात्रीच्या वेळी वाहनांची वर्दळ तुलनेने कमी असते. अशा वेळी वाहनांचा वेग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांच्या पालनाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

मृतदेहांचे शवविच्छेदन होणार

नायर रुग्णालयात मृत तिघांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येतील. दरम्यान, मृतांपैकी एका २५ वर्षीय तरुणाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून अपघातामागील कारणांचा सविस्तर तपास केला जात आहे. ३ तरुणांचा यात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts