राजकारण

देश आर्थिक संकटात? मोदींच्या वाढदिवसावर किती खर्च?

PM Modi Birthday
3

PM Modi Birthday : जगभरातील तणाव आणि आखाती देशातील युद्ध यामुळे भारतात काही दिवस तेलाचा संकट पाहायला मिळाला…युद्धामुळे भारताला तेल महाग मिळाला आणि जनतेला महागाईचा सामना करावा लागला…तसंच ट्रम्प यांनी भारताला धमकावत इराण आणि रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करू नका, व्हेनेझुएलाकडून खरेदी करा, असं म्हटलं…भारताने देखील ट्रम्प यांच्या दबावात येऊन इराण-रशियाकडून तेल खरेदी करणं देखील कमी केलं…भारतावर होणार आर्थिक परिणाम पाहता, पंतप्रधान मोदींनी जनतेला काटकसर करण्याचे सांगितले…सोने खरेदी करू नका, विदेशात काम असेल तर जा, अनावश्यक खर्च टाळा असा सल्ला पीएम मोदींनी दिला…पण पीएम मोदी जनतेला सल्ला देतात आणि त्यांचा वाढदिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्यात आला…पाहूयात पीएम मोदींच्या वाढदिवसाला किती खर्च आलाय….

मोदींच्या 76व्या वाढदिवसानिमित्त देशभरात काय-काय कार्यक्रम झाले? ( PM Modi Birthday )

एकीकडे देशातील सामान्य जनतेला, मध्यमवर्गाला आणि गरिबांना देशाच्या हितासाठी काटकसरीचे, बचतीचे आणि साधेपणाचे धडे दिले जात असतानाच, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून पाण्यासारखा पैसा खर्च होताना दिसत आहे… नुकताच देशभरात साजरा झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 76 वा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने भाजप आणि मित्रपक्षांच्या सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये झालेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी यावरून देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे… सर्वसर्वसामान्य जनतेने देशासाठी त्याग करायचा, सोन्याची खरेदी थांबवायची, पेट्रोल-डिझेल वाचवायचे आणि नेत्यांनी मात्र स्वतःच्या ब्रँडिंगसाठी आणि वाढदिवसाच्या महोत्सवांवर सरकारी खजिन्यातून किंवा अप्रत्यक्ष यंत्रणेचा वापर करून कोट्यवधी रुपये उडवायचे, हा कुठला न्याय, असा संतप्त सवाल आता देशातील सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे… या संपूर्ण प्रकरणाने आता देशातील वाढती आर्थिक विषमता आणि नेत्यांची मानसिकता यावर एक नवीन जाहीर चर्चा घडवून आणली आहे…

आखाती देशांमधील भू-राजकीय तणावाचा थेट संबंध भारताच्या गृहिणीच्या बजेटपासून ते देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या तिजोरीपर्यंत असतो… इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आणि कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाला… भारताला हे तेल खरेदी करण्यासाठी दरमहा अब्जावधी डॉलर्स मोजावे लागतात… जर कच्च्या तेलाचे दर असेच वाढत राहिले, तर भारताला आपली आयात चालू ठेवण्यासाठी परकीय चलनाची मोठी गंगाजळी रिकामी करावी लागेल… यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमालीचे घसरू लागले…याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसला…

हेही वाचा : लालबागच्या राजाच्या दरबारात गरीब-श्रीमंत भेद? सामान्य भक्तांचा सवाल नेमका काय?

मोदींचे सोने आणि परदेशी प्रवासाबाबत नेमके आवाहन काय? ( Seva Sankalp Abhiyan )

याच आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत पातळीवर पावले उचलण्यास सुरुवात केली… पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत संबोधनात आणि विविध बैठकांमध्ये नागरिकांना आवाहन केले आहे की, भारतामध्ये परंपरेने आणि सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली जाते, काही काळ सोने खरेदी करू नका, आणि विदेशात जाणं टाळा…. भारत हा जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे… आपण जेवढे जास्त सोने खरेदी करतो, तेवढे अब्जावधी डॉलर्स आपल्याला परदेशात द्यावे लागतात… त्यामुळे चालू आर्थिक वर्षात नागरिकांनी सोन्याची खरेदी लांबणीवर टाकावी… तसंच पर्यटन, वैयक्तिक कारणांसाठी परदेशात जाणे टाळावे, कारण परदेशी प्रवासातही भारतीय चलन डॉलरमध्ये परावर्तित होऊन देशाबाहेर जाते… याशिवाय, वाहनांचा वापर कमी करून इंधनाची बचत करावी, जेणेकरून कच्च्या तेलाची आयात कमी करता येईल आणि देशाचे परकीय चलन वाचवता येईल…

जनतेने देशाच्या हितासाठी पालनही केले…पण राजकीय नेते हे पाळताना दिसतात का? असा प्रश्न निर्माण झालाय… पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाने देशभरात ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्याची घोषणा केली होती… पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, या काळात गरिबांना अन्नदान, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम आणि आरोग्य तपासणी असे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील… परंतु, प्रत्यक्ष जमिनीवर या कार्यक्रमांचे जे स्वरूप पाहायला मिळाले, ते निव्वळ सेवाभावी नसून अत्यंत चकचकीत, भव्य आणि अवाढव्य खर्चाचे होते…

मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांवरून विरोधकांचे सवाल ( PM Modi Birthday Celebration )

उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या राज्यांमध्ये, जिथे अद्यापही गरिबी, बेरोजगारी आणि कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे, तिथे राज्य सरकारांनी आणि स्थानिक प्रशासनाने पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या स्वागतासाठी शहरांमधील प्रमुख रस्ते, चौक आणि सरकारी इमारती लाखो रुपयांच्या रोषणाईने आणि भव्य होर्डिंग्सनी सजवल्या होत्या. अनेक जिल्ह्यांमध्ये विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, लेझर शो आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षांच्या दाव्यानुसार, या संपूर्ण आयोजनासाठी थेट आणि अप्रत्यक्षपणे शासकीय यंत्रणेचा, गाड्यांचा आणि सरकारी अधिकाऱ्यांचा वापर करण्यात आला. या भव्य उत्सवांवर आणि जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपयांचा धूर करण्यात आला. बिहारमध्ये तर पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक भागांतील जनता आधीच संकटात असताना, पाटण्यासारख्या शहरांमध्ये राजकीय नेत्यांच्या मोठ्या कटआऊट्सवर आणि स्वागतावर झालेला खर्च पाहून स्थानिक नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातही मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक आमदारांपर्यंत सर्वांनीच या वाढदिवसाला एका मोठ्या सणाचे स्वरूप दिले होते. यावरूनच आता जनतेमध्ये असा संदेश गेला आहे की, देशातील गरिबांना आणि मध्यमवर्गाला बचतीचे सल्ले देणारे नेते स्वतः मात्र राजेशाही थाटात जगण्यात आणि पक्षाच्या प्रचारात मग्न आहेत.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts