Breaking News :
  • Home
  • Top News
  • लालबागच्या राजाच्या दरबारात गरीब-श्रीमंत भेद? सामान्य भक्तांचा सवाल नेमका काय?
Ganeshotsav 2026

लालबागच्या राजाच्या दरबारात गरीब-श्रीमंत भेद? सामान्य भक्तांचा सवाल नेमका काय?

Lalbaugcha Raja VIP Darshan
2

Lalbaugcha Raja VIP Darshan : मुंबईतील गणेशोत्सवाची शान आणि करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दरबारात दरवर्षी लाखो भाविक पाहायला मिळतात…बाप्पाच्या दर्शासाठी भक्त महाराष्ट्राच नाही तर देशभरातून येताना दिसतात…तर काही भाविक विदेशातून देखील बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात…लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दररोज कोणी ना कोणी व्हीआयपी पाहायलाच मिळतो…तसंच राजकीय नेते, उद्योगपती देखील बाप्पाच्या चरणी लीन होताना दिसतात…मात्र बाप्पाच्या दारात गरीबांना वेगळा आणि श्रीमंतांना वेगळा न्याय दिला जातो, असा आरोप केला जातो…नवसाला पावणारा आणि सर्वांची दुःखे हरणारा बाप्पा सर्वांसाठी एकच असताना, त्याच्या लालबागच्या मंडपात मात्र श्रीमंत, सेलिब्रिटी आणि राजकारण्यांसाठी पायघड्या आणि गरीब, कष्टकरी जनतेसाठी केवळ धक्के आणि अवमान का? असा प्रश्न विचारला जात आहे…त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की बाप्पाच्या दरबारात दोन न्याय का? VIP लोकांना स्पेशल सुविधा का? गरीबांना धक्के मारत का बाहेर काढल्या जातं, 10 सेकेंदही आशीर्वाद का घेऊ दिले जात नाही?

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दररोज मोठी गर्दी पाहायला मिळते…लालबाग राजा गणपती मंडळ देशातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळांपैकी एक आहे…या लालबागच्या राजाची स्थापना 1934 मध्ये गरीब कामगार, कोळी बांधव आणि छोट्या फेरीवाल्यांनी आपल्या हक्काच्या बाजारासाठी, केलेल्या नवसामुळे झाली होती… जो उत्सव मुळात गरीब आणि कष्टकऱ्यांच्या श्रद्धेतून जन्माला आला, त्याच उत्सवात आज 90 वर्षांनंतर सामान्य माणसाला अत्यंत दुय्यम वागणूक मिळत असल्याचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते… लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दोन प्रमुख रांगा असतात, ज्यामध्ये एक केवळ दुरून दर्शन घेण्याची ‘मुखदर्शन रांग’ आणि दुसरी थेट बाप्पाच्या चरणांना स्पर्श करण्याची ‘नवसाची रांग’ होय… या नवसाच्या रांगेत उभे राहणारे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले अत्यंत गरीब, मध्यमवर्गीय आणि नवस बोललेले कुटुंब प्रमुख असतात….

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा ( Lalbaugcha Raja VIP Darshan )

या सर्वसामान्य भाविकांना लालबागच्या राजाच्या चरणांपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 12 ते 24 तास आणि काही वेळा तर 40-40 तास सलग रांगेत उभे राहावं लागतं… ऊन, पाऊस, भूक आणि तहान यांची पर्वा न करता, भाविक, लहान मुलांना घेऊन अनेक माताही दर्शन रांगेत उभ्या पाहायला मिळतात.. वृद्ध नागरिकही किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आणि पत्र्यांच्या शेडमध्ये कोंडलेल्या रांगेत उभे राहतात..नवसाची रांग सर्वात मोठी असते… काही मुख्य आणि गर्दीच्या दिवसांमध्ये ही रांग 5 ते 7 किलोमीटरपर्यंत लांब पोहोचते…तर मुखदर्शन रांग 1 ते 2 किलोमीटरपर्यंत असते…. धक्कादायक बाब म्हणजे, एवढा प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करून जेव्हा हा सामान्य भक्त अखेर बाप्पाच्या मुख्य मंचावर पोहोचतो, तेव्हा त्याला बाप्पाच्या चरणी डोके टेकवण्यासाठी अवघे 5 ते 10 सेकंदही मिळत नाहीत… मंचावर उपस्थित असलेले मंडळाचे कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षक या सामान्य भक्तांना गुरांसारखे ओढून, अमानुषपणे पुढे ढकलतात… कित्येक महिला आणि वृद्धांना या धक्काबुक्कीत किरकोळ दुखापतीही होतात… अनेक भाविक डोळ्यात अश्रू घेऊन मंचावरून खाली उतरतात, कारण त्यांना बाप्पाकडे नीट हात जोडण्याची, डोळे भरून पाहण्याची संधीही दिली जात नाही…

याउलट, दुसरीकडे मंडपात सुरू असणारी व्हीआयपी संस्कृती पाहून मनात एकच प्रश्न निर्माण होतो, की बाप्पा आम्हाला पण असं श्रीमंत का नाही बनवलं….जेव्हा एखादा बॉलिवूडचा सेलिब्रिटी, बडा उद्योगपती, राजकारणी किंवा स्वतः मंडळाच्या कार्यकर्त्यांचे नातेवाईक येतात, तेव्हा त्यांच्यासाठी कडेकोट बंदोबस्तात रेड कार्पेट अंथरलेला पाहायला मिळतो…व्हीआयपी गेटमधून अवघ्या 5 ते 10 मिनिटांत हे अतिमहत्त्वाचे लोक मुख्य मंचावर ऐटीत पोहोचतात… तिथे गेल्यानंतर त्यांना पुढे ढकलण्याची हिंमत कोणाचीही होत नाही… हे व्हीआयपी लोक बाप्पाच्या चरणाशी आरामात उभे राहतात, हवं तेवढं डोके टेकवून बाप्पाची प्रार्थना करतात…बाप्पाच्या मूर्तीसोबत वेगवेगळ्या पद्धतीने फोटो काढतात… सामान्य भक्ताला जिथे 10 सेकंद उभे राहू दिले जात नाही, तिथे श्रीमंतांना 5 ते 10 मिनिटे मंचावर खास आदरातिथ्य दिले जाते, हे पाहून सामान्य भक्तांच्या मनात मोठे दु:ख निर्माण होते…हे फक्त याच ठिकाणी पाहायला मिळते असं नाही, हे महाराष्ट्रासह देशभरातील मंदिरात सुरू आहे…वारीमध्ये वारकरी एवढे दिवस पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात…आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी नीट विठुरायाचे दर्शनही करता येत नाही…VIP लोक येतात आणि ऐटीत दर्शन करून निघून जातात…आपण वळूयात आपल्या मूख्य विषयाकडे..

हेही वाचा : लालबाग राजाच्या VIP दर्शनासाठी किती पैसे लागतात? काय प्रोसेस असते?

सेलिब्रिटी आणि नेत्यांच्या दर्शनाच्या व्हिडिओंमुळे चर्चा ( Lalbaugcha Raja 2026 )

लालबागच्या राजाच्या दर्शनातील भेदभावाचे अनेक व्हिडिओ दरवर्षी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत राहतात.. त्यामुळे दरवर्षी इंटरनेटवर एका मोठ्या वादाला तोंड फुटते… “देवाच्या दरबारात पैशाने आणि सत्तेने न्याय ठरतो का?” असा सवाल नेहमीच विचारला जातो… या वाढत्या वादावर आणि जनसामान्यांच्या रोषावर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून नेहमीच एक ठरलेले प्रशासकीय स्पष्टीकरण दिले जाते… मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, दरवर्षी उत्सवाच्या 10 दिवसांत 1 कोटींहून अधिक भाविक लालबागमध्ये येतात…. एवढ्या अथांग गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक काम असते… जर सेलिब्रिटी किंवा मोठ्या नेत्यांना सामान्य रांगेत सोडले, तर तिथे चेंगराचेंगरी होण्याची आणि सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती असते… त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही स्वतंत्र व्यवस्था ठेवावी लागते, असा युक्तिवाद मंडळाकडून केला जातो… तसेच गर्दीचा प्रवाह सतत सुरू ठेवण्यासाठी मंचावरील लोकांना पुढे ढकलावे लागते, असेही त्यांचे म्हणणे असते…

मात्र, मंडळाचा हा युक्तिवाद सर्वसामान्यांना पटणारा नाही… व्यवस्थापनाच्या नावाखाली सामान्य भक्तांचा मानवी अधिकार आणि त्यांची श्रद्धा पायदळी तुडवली जाऊ शकत नाही, असे मत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे… तिरुपती बालाजी, सिद्धिविनायक किंवा शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही लाखो लोकांची गर्दी असते आणि तिथेही व्हीआयपी दर्शन असते, परंतु तिथे भाविकांना अशा प्रकारे अमानुषपणे धरून बाहेर ढकलले जात नाही… तिथल्या डिजिटल आणि टोकन पद्धतीमुळे लोकांना मान सन्मानाने दर्शन मिळते.. मग लालबागच्या राजाच्या दरबारातच अशी “गुंडगिरी आणि दादागिरी” का चालते, असा थेट प्रश्न भाविक उपस्थित करत आहेत…

या संपूर्ण प्रकारामुळे आता भारतातील गणेशोत्सवाच्या मूळ संकल्पनेलाच गालबोट लागत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात समाजातील सर्व जाती-धर्माच्या आणि गरीब-श्रीमंत लोकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यातील भेद मिटवण्यासाठी केली होती… परंतु, आज लालबागच्या राजाच्या दरबारात गरिबी आणि श्रीमंतीची ही दरी अधिक ठळकपणे पाहायला मिळत आहे… पैशाच्या आणि ओळखीच्या बळावर बाप्पाच्या चरणाशी तासन् तास घालवणारे व्हीआयपी आणि जीवाचे रान करून केवळ एका सेकंदाच्या दर्शनासाठी आतुरलेला गरीब भक्त यांच्यातील हे चित्र अत्यंत वेदनादायी आहे…शेवटी, बाप्पा हा कधीही गरीब आणि श्रीमंत असा भेद करत नाही.. भेद करतो तो मानवी अहंकार आणि सत्तेची हाव, असं म्हटलं जात आहे.. जोपर्यंत लालबागचे मंडळ आपल्या व्यवस्थापनात सुधारणा करत नाही, व्हीआयपी लोकांना मिळणारी अवाजवी सूट कमी करत नाही आणि सामान्य भक्ताला सन्मानाने दर्शन देण्याची व्यवस्था निर्माण करत नाही, तोपर्यंत देवाच्या दारातील या अन्यायाविरुद्धचा वाद आणि सर्वसामान्यांचा संताप असाच सुरू राहिल, असं म्हटलं जात आहे…तुम्हाला काय वाटतं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसोबत जे वागणं सुरू आहे ते योग्य आहे का?

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts