Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • नाशिकच्या प्रश्नांवर राज ठाकरेंचा ‘राज’कीय प्रहार; कुंभमेळ्यापासून शिक्षण व्यवस्थेपर्यंत सरकारला घेरले
राजकारण

नाशिकच्या प्रश्नांवर राज ठाकरेंचा ‘राज’कीय प्रहार; कुंभमेळ्यापासून शिक्षण व्यवस्थेपर्यंत सरकारला घेरले

Raj Thackeray Nashik
30
Raj Thackeray Nashik: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली. सुवर्णपदक विजेते खेळाडू दिलीप गावित यांचं भेटीच्या गैरसमजपासून ते कुंभ मेळ्याच्या तयारी, नाशिकमधील विकासकामे आणि शिक्षण व्यवस्थेपर्यंत अनेक विषयांवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील सुवर्णपदक विजेते पॅरा- अॅथलिट दिलीप गावित हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. मात्र, भेट न झाल्याने त्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली होती. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना राज ठाकरे म्हणाले, ” दिलीप गावित आल्याची मला माहितीच नव्हती. ते आले आणि मी भेटणार नाही, असे होऊ शकत नाही. मला सांगितले असते तर मी नक्की भेटलो असतो. या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. “गावित दिल्लीहून परतल्यानंतर त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: वृद्धी योगामुळे ‘या’ दोन राशींचे नशीब उजळणार? धनलाभाचे संकेत; वाचा १२ राशींचे राशिभविष्य

नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या तयारीवर बोलताना राज ठाकरे यांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. २०१५ च्या कुंभमेळ्यात झालेल्या कामांचे कौतुक करत त्यांनी सध्याच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली. “कुंभमेळा हा विकासासाठी असतो, पैसे कमावण्यासाठी नाही,” असे म्हणत त्यांनी कामांमध्ये पारदर्शक ठेवण्याची मागणी केली.

रस्त्यांवरील खड्डे, अपघात आणि प्रशासनाच्या भूमिकेवर टीका करताना त्यांनी आरोप केला की, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदार आणण्याच्या मुद्द्यावर त्यांनी सवाल उपस्थित केला. “महाराष्ट्रात कंत्राटदार नाहीत का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

स्मार्ट सिटी योजना  ( Raj Thackeray Nashik )

स्मार्ट सिटी योजनेवरही त्यांनी टीका केली. शहरांचा विकास होण्याऐवजी परिस्थिती खराब होत असल्याचे त्यांनी म्हटले. नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी प्रशासनाला लक्ष्य केले.

शिक्षण व्यवस्थेवर बोलताना राज ठाकरे यांनी NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. तरुणांमध्ये वाढणारा असंतोष हा गंभीर विषय असल्याचे सांगत त्यांनी सरकारने शिक्षण क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली.

कोचिंग क्लासेसच्या वाढत्या प्रभावावर टीका करत त्यांनी शिक्षणाचा व्यवसाय होत असल्याचे म्हटले. “विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असेल तर त्यांनी प्रश्न विचारू नयेत का?” असा सवाल करत त्यांनी सरकारला आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts