Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Nashik Kumbh Mela : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओझर विमानतळावर दाखल; रामकुंडाच्या दिशेने रवाना, नाशिकमध्ये कडेकोट सुरक्षा
महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओझर विमानतळावर दाखल; रामकुंडाच्या दिशेने रवाना, नाशिकमध्ये कडेकोट सुरक्षा

Nashik Kumbh Mela
10
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले आहे. विमानतळावरून त्या रामकुंडाच्या दिशेने रवाना झाल्या असून, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रामकुंडावर नेमके कोणते धार्मिक कार्यक्रम होणार? जाणून घ्या दौऱ्याचे महत्त्वाचे अपडेट्स.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महाध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नाशिकमध्ये (Nashik Drupadi Murmu) दाखल झाल्या आहेत. त्यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून, विमानतळावरून त्या रामकुंडाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. (President of India)राष्ट्रपतींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रामकुंड परिसरात महाध्वजारोहण सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून, या ऐतिहासिक कार्यक्रमाकडे राज्यासह देशभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.

ओझर विमानतळावर राष्ट्रपतींचे आगमन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महाध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे. त्यानुसार त्या ओझर विमानतळावर दाखल झाल्या. विमानतळावरून त्यांचा ताफा रामकुंडाच्या दिशेने रवाना झाला आहे. (Nashik Ramkund)राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रामकुंडावर महाध्वजारोहणाचा सोहळा नाशिकमधील रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महाध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत महाध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्याद्वारे नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पर्वाचा औपचारिक प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमात ध्वजस्तंभ पूजन, ध्वजपूजन आणि महाध्वजारोहण असे धार्मिक विधी पार पडणार आहेत. या सोहळ्यासाठी धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, साधू-संत आणि राज्यातील प्रमुख राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. (Ozar Airpot)

महाध्वजारोहणानंतर राष्ट्रपतींच्या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर ध्वजस्तंभ पूजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचाही समावेश आहे. (Nashik Dhwajarohan)सायंकाळी रामकुंड येथे आयोजित गोदावरी महाआरतीला त्या उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या वेबसाइटचे उद्घाटन, विशेष टपाल तिकिटाचे अनावरण आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन असे कार्यक्रमही नियोजित आहेत. (Nashik Kumbh Mela)

नाशिकमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, काही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. रामकुंड आणि कार्यक्रमस्थळांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्याच्या हालचाली आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस व प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आजच्या महाध्वजारोहण सोहळ्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला महत्त्वाचा प्रारंभिक टप्पा मिळणार आहे. आगामी पर्वासाठी पायाभूत सुविधा, भाविकांची व्यवस्था, वाहतूक आणि सुरक्षा यांसारख्या बाबींवर प्रशासनाला पुढील काळात लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

Nashik Kumbh Mela 2027 : गोदावरीच्या मंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभपर्वाची चाहूल! गोदाकाठी सिंहस्थ कुंभपर्वाची चाहूल! राष्ट्रपती मुर्मूंच्या उपस्थितीत उद्या ध्वजारोहण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts