Maharashtra Diesel Can Ban Triggers Industry Concerns: राज्यात पेट्रोल पंपांवरून कॅन, डबकी किंवा इतर कंटेनरमध्ये डिझेल देण्याची निर्बध आणण्याच्या निर्णयामुळे उद्योग आणि व्यापारी क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने या संदर्भात कडक निर्देश जारी केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंपावर कारवाईचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी
या निर्णयाविरोधात चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड (CAMIT) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या मते, अनेक व्यवसाय आणि सेवा क्षेत्रे जनरेटरवर अवलंबून असल्याने त्यांना नियमितपणे कॅनमधून डिझेल खरेदी करावे लागते.
हेही वाचा : दिल्लीत अभिजीत दीपके यांची दमदार एंट्री; जंतर-मंतर आंदोलनाकडे देशाचे लक्ष
हॉटेल्स, रुग्णालये, लग्नसमारंभाचे हॉल, निवासी व व्यावसायिक इमारती तसेच लघुउद्योगांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटर हा महत्वाचा पर्याय असतो. अशा परिस्थितीत कंटेनरमधून डिझेल मिळणे बंद झाल्यास त्यांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असा CAMIT चा दावा आहे.
संघटनेने प्रशासनाला पर्याय उपाय सुचवत, कॅनमध्ये डिझेल घेणाऱ्या ग्राहकांकडून स्वयंघोषणापत्र (Self Declaration) घेण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी केली आहे. साठेबाजी किंवा गैरवापर रोखण्यासाठी कठोर नियंत्रण आवश्यक असले तरी प्रामाणिक व्यावसायिकांना त्याचा फटका बसू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
इंधनाच्या किमतींच्या बाबतीत
दरम्यान, इंधनाच्या किमतींच्या बाबतीत देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमतींमध्ये चढ- उतार सुरू असले तरी किरकोळ दरांमध्ये तत्काळ बदल झालेला नाही.
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक घडामोडी, पुरवठा साखळीवरील दबाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती यांचा परिणाम भविष्यात इंधन दरांवर होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात बाजारातील परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











