दिल्ली येथून धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दिल्लीतील श्री शारदा इन्स्टीट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हे गैरवर्तन संत स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी बाबा यांनी केले असून ते फरार झाले आहे.
संत स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी बाबा यांनी विद्यार्थिनीला व्हॉट्सअपवर अश्लिल मॅसेज करणे, रात्री उशीरा त्यांच्या खोलीत बोलावणे, नापास करण्याची धमकी देणे यासह परदेशात नेण्याचे लालूच दाखवणे, परीक्षेत मार्क कापणे यासारखे गैरवर्तन करत टॉर्चर केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार फक्त एकाच विद्यार्थिनीसोबत घडला नसून बऱ्याच विद्यार्थिनी या बाबांच्या आश्वासनांना आणि धमक्यांना बळी पडल्या आहे. याप्रकरणी संत स्वामी चैतन्यानंद यांच्यावर एफआर दर्ज करण्यात आला आहे.
दिल्ली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी चैतन्यानंद यांनी विद्यार्थीनींना रात्री उशीरा व्हॉट्सअप मॅसेज पाठवले. या मेसेजेस मधील भाषा प्रचंड अश्लील होती, तर काही मॅसेजमध्ये माझ्या रुमवर या तुम्हाला परदेशी फिरायला नेईन, तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत. माझे ऐकले नाही तर तुम्हाला नापास करीन अशा धमक्या असलेले मेसेजेस देखील होते.
तीन महिला वॉर्डन करत होत्या मदत
या घटनेत संत स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी बाबा यांना इन्स्टिटयूट मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी तीन महिला वॉर्डन मदत करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या महिला वॉर्डन मुलींना शांत बसवण्यासाठी आणि त्यांच्या मोबाईलमधील चॅट डीलीट करण्यासाठी मदत करत होत्या. यावर विद्यार्थिनीने आक्षेप घेतल्यास वॉर्डन आपल्या हॉस्टेलमधून काढून टाकण्याची धमकी देत होत्या. त्यामुळे विद्यार्थिनी आम्ही नाईलाजाने शांत बसायच्यात. दिल्ली पोलीसांनी आता तिन्ही महिला वॉर्डनचे जबाब नोंदवले असून त्यांच्या भूमिकेची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थीनींचे करत होता लैंगिक शोषण
या प्रकरणी ४ ऑगस्ट २०२५ रोजी श्री. शृंगेरी मठाच्या वतीने प्रशासक पी.ए. मुरली यांनी दिल्ली पोलिसांना तक्रार दिली होती. या तक्रारीत स्पष्ट लिहिण्यात आले होते की चैतन्यानंद बाबाने आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केले आहे, त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी तपास करत याप्रकरणी आणखी सत्य बाहेर काढले. तपासादरम्यान पोलिसांनी इस्टिट्यूटच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली असता रेकॉर्डिंग डिलीट केलेली आढळली.
त्यामुळे महिला वॉर्डन आणि बाबाने मिळून पुरावे नष्ट केले असल्याचे समोर आले. आता डीव्हीआरला फॉरेन्सिक लॅबोरेटरीत पाठवले आहे. विद्यार्थीनींचे मोबाईल देखील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. कारण अनेक चॅट्स डीलिट केले असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. डीलीट केलेला मजकूर रिकव्हर झाल्यास केस आणि मजबूत होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हे संत स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी बाबा फरार आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.