बीड शहरातील गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. बीड शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून बीड शहरात घडली आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमधून समोर आली आहे. यश देवेंद्र ढाका या 22 वर्षीय तरुणाची काल रात्री हत्या करण्यात आली. मित्रासोबत वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादातून या दोन मित्रांमध्ये वैर निर्माण झालं आणि त्यातूनच यशचा मित्र सुरज काटे याने यशवर धारदार शस्त्राने पोटात चाकू खुपसून खून केला.
हत्येचं कारण काय?
महिन्याभरापूर्वी यश आणि सुरज या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले. त्यामुळे त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले आणि यातूनच यशची हत्या झाल्याचे कारण समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली आहे. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखी या हत्येत इतरांचा समावेश होता का? याचा शोध घेतला जात आहे.
कोण आहे यश ढाके?
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा यश, स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका याचा 22 वर्षीय मुलगा. त्याचाच मित्र सुरज काटे याच्यासोबत झालेल्या एका वादातून सुरज ने वर्दळीच्या ठिकाणी यशच्या पोटात धारधार शास्त्राने वार करून त्याची हत्या केली.या घटनेने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांची टीम पंचनामा करत असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
छातीत झालेल्या वाराने यश रक्तबंबाळ
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात काल (गुरुवारी, 25 सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यश देवेंद्र ढाका (वय २२, रा. बीड) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली आहे. छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश रक्तबंबाळ झाला होता. जखमी यशला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वेळ हातातून निघून गेल्याने डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
महिन्यापूर्वी झाला होता वाद
यश आणि सूरज हे दोघे मित्र होते. साधारणतः महिनाभरापूर्वी वाढदिवस साजरा करताना या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यामुळे त्यांच्यात वैर निर्माण झाले होते. गुरुवारी रात्री देखील माने कॉम्प्लेक्स परिसरात त्यांच्यात वाद झाले. यावेळी सूरजने सोबत असलेला चाकू काढून थेट यशच्या छातीत खुपसला. यात रक्तबंबाळ होऊन यश खाली कोसळला होता. त्यानंतर यशच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र सूरज हा तिथून फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणी टॉपर सुरु केला आहे.