पुणे : सध्या महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील फार चर्चेत आहे. ती यंदा तिच्या अदा किंवा नृत्याने चर्चेत नसून एका कार अपघातामुळे चर्चेत आली आहे. आणि नुसतीच चर्चेत नाही तर आता तिच्यावर आरोप लावत गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. आणि प्रकारामुळे ती जेल मध्ये देखील जाऊ शकते. आजच्या या लेखात जाणून घेऊया गौतमी पाटील यांची कार नेमकं धडकली तरी कुणाला ? आणि अटक झाली तरी कुणाला ?
पुणे–मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला रिक्षा लावून चालक पॅसेंजरची वाट बघत होता. परंतु त्याचवेळी वडगाव पुलाजवळ एक धक्कादायक अपघात घडला. नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारने या रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक जखमी झाला. त्यावेळी त्याला उचलायचे सोडून कार चालकाने आणि कारमधील व्यक्तीने पळ काढला. आणि काही वेळात त्यापैकी एका व्यक्तीने टोईंग कार बोलावून अपघातग्रस्त कार रस्त्यावरून हलवली. त्यानंतर काही रिक्षाचालकांनी घटनास्थळी पोहोचताच जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये भरती केले.
हा अपघात मंगळवारी, दि. 30 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडला. सामाजी मरगळे असे या रिक्षाचालकाचे नाव असून त्यांच्या नातेवाईकांनी नृत्यांगना गौतमी पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन देखील केले होते. पोलिसांकडून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. हा अपघात नेमका कसा घडला ? कारची वेगवान हालचाल का झाली ? 15 मिनिटात इतके नुकसान कसे काय झाले ? या सर्व प्रश्नांनाही उत्तरे पोलीस शोधत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी आता एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहे गौतमी पाटील ?
गौतमी पाटील ही महाराष्ट्राची नृत्यांगना असून सोशल मीडियावर तिचे प्रचंड चाहते आहे. ती महाराष्ट्राची संस्कृती, लोकप्रिय नृत्य प्रकार लावणीसाठी ओळखली जाते. तिचा जन्म धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावामध्ये झाला होता. तिने पारंपरिक महाराष्ट्रीयन नृत्यप्रकारात लावणीच्या अदांनी प्रेक्षकांना भारावून टाकले असून तिची फॅन लिस्ट सुद्धा मोठी आहे. ती मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली असून आई ने दिलेल्या पाठिंब्यामुळे तिने लोकनृत्यात कामगिरी केली.
कोण करत आहे या प्रकरणाचा तपास
महाराष्ट्राची नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या स्वतःच्या मालकीच्या कारने महामार्गावर उभ्या असलेल्या रिक्षाचालकाला धडक दिल्याची घटना घडली. या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यासाठी विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव पोलीस उपायुक्त संभाजी कदम पाटील आहे. त्यांनी या प्रकरणाचा तपस सुरु केलाया आहे. या प्रकरणाचा फिर्यादीनुसार तपास करण्यात येत असून सीसीटीव्ही व्हिडीओ चेक करण्यात आला आहे. आलेल्या तक्रारींचा निरसन करण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याचे मत पोलीस उपायुक्त संभाजी कदम पाटील यांनी केले आहे.