Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • बीडमध्ये भीषण अपघात! ट्रक आणि एसटीची जोरदार धडक, 13 प्रवासी गंभीर जखमी
ताज्या बातम्या

बीडमध्ये भीषण अपघात! ट्रक आणि एसटीची जोरदार धडक, 13 प्रवासी गंभीर जखमी

Beed Accident | बीडमध्ये (Beed) मोठा अपघात (Accident) झाला आहे. कळंब रोडवर ट्रक (Truck) आणि एसटी बसची (ST Bus) जोरदार धडक होऊन हा अपघात घडला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहे आहेत. तर या भीषण अपघातानंतर जवळच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा  – शेतकऱ्यांसाठी खुशखबर! महायुती सरकारचा मोठा प्लॅन, लवकरच करणार मोठी घोषणा

ट्रकला एसटी बसची जोरदार धडक

कळंब रोडवर आज सकाळी 6:00 वाजता भीषण अपघात घडला. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसने जोरदार धडक दिली आणि अपघात घडला. कोल्हापूरहून माजलगावकडे जाणारी एसटी बस चिंचोली पाटीजवळ आली असता रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की एसटीच्या पुढच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातात एसटी चालक, कंडक्टरसह 13 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. तर सध्या जखमींना तातडीनं केज येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये. तर या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. तर पोलिसांनी या घटनेची सर्व माहिती घेत अपघातातील सर्व जखमींना तातडीनं उपचार मिळण्यासाठी मदत केली.  तर अपघातातील सर्व जखमींना प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts