Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • वाल्मिक कराडची अचानक तब्येत खालावली; तातडीने रुग्णालयात केले दाखल, नेमकं झालं काय?
Top News

वाल्मिक कराडची अचानक तब्येत खालावली; तातडीने रुग्णालयात केले दाखल, नेमकं झालं काय?

Walmik Karad | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी वाल्मीक कराडची (Walmik Karad) प्रकृती अचानक खालावली आहे. सध्या वाल्मीक कराडला तुरूंगातून तातडीनं जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आरोपी वाल्मीक कराडला तुरूंगात अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असे असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – फरार निदा खानचा ठावठिकाणा लागला? अटकेपासून वाचण्यासाठी आखला नवा प्लॅन

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, नेमकं झालं काय?

आरोपी वाल्मीक कराडला अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सध्या वाल्मीक कराडची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. रूग्णालयात कराडच्या चाचण्यांसदर्भात प्रक्रिया सुरू असून याद्वारे त्याला नेमकं काय झालं आहे? हे स्पष्ट होणार आहे.

वाल्मीक कराडच्या वैद्यकीय चाचण्या करण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या त्याला उपाचारासाठी आयसीयूमध्ये दाखल करण्याची सोय करण्यात आली आहे. तर वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडल्याने, त्याला नेमकं काय झालं आहे? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता दीड वर्ष पूर्ण झाले आहे. तर बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. तर या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या तुरूंगात असून यातील एक आरोपी विष्णू चाटे हा लातूर तुरूंगात आहे. तर बाकी आरोपी बीड जिल्हा तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. अशातच आता बीड तुरूंगात असलेल्या वाल्मीक कराडची प्रकृती अचानक बिघडली असून चर्चांना उधाण आले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts