Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • राहुल गांधींच्या भाषणावरुन लोकसभेत जोरदार गदारोळ; विरोधी पक्षनेते म्हणाले…
Top News

राहुल गांधींच्या भाषणावरुन लोकसभेत जोरदार गदारोळ; विरोधी पक्षनेते म्हणाले…

राहुल गांधींच्या भाषणावरुन लोकसभेत मोठा गदारोळ; विरोधी पक्षनेते म्हणाले...
64

नवी दिल्ली Rahul Gandhi : लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी या विधेयकावर बोलत आहेत. जेव्हा ते बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा अध्यक्षांनी त्यांना विचारले की त्यांच्या हाताला काय झालं आहे. अध्यक्षांच्या प्रश्नाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते म्हणाले, “साहेब, माझ्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.” यानंतर राहुल गांधींनी आपलं भाषण सुरु केलं. मात्र त्यांच्या भाषणादरम्यान संसदेत जोरदार हंगामा झाला.

हेही वाचा : संसदेत चर्चा सुरु असताना मध्यरात्री महिला आरक्षण कायदा अंमलात; अधिसूचना

राहुल गांधी काय म्हणाले :

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, हे महिला आरक्षण विधेयक नाही. महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये मंजूर झाले होते. ते म्हणाले की, हे विधेयक देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे. हे विधेयक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या विरोधात असून, त्यांचे हक्क काढून घेण्याचा अजेंडा आहे. सरकार घाबरलं आहे. त्यांनी आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये हे आधीच केलं आहे आणि आता त्यांना देशभरात तेच करायचं आहे. या विधेयकाचा महिला सक्षमीकरणाशी काहीही संबंध नाही. तुम्ही सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहात. हे विधेयक देशद्रोही आहे. आम्ही सरकारला हे करु देणार नाही. दक्षिण आणि उत्तर भारतासोबत भेदभाव केला जात आहे. दलित आणि आदिवासींचा सहभाग कमी होत आहे.

राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत मोठा गदारोळ :

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि म्हणाले की, काँग्रेस पक्षानं ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता. आदिवासींना हिंदू म्हटलं जातं, तरीही त्यांना स्थान नाकारलं जातं, असं म्हणत राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. एका जादूगाराचा किस्सा सांगत राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्याकडून एक चूक झाली आणि त्यानंतर ते जादू करु शकले नाहीत. “माझ्या आजीनं मला बागेत दुसरीच एक गोष्ट शिकवली. ती म्हणाली की खरी शक्ती नतमस्तक होऊन काम करते आणि स्वतःला कधीच दाखवत नाही. जादूगार आणि व्यावसायिक सर्वांना माहीत असतात.”

जादूगार शब्दावरुन चांगलाच राडा :

राहुल गांधी म्हणाले की, सरकारला आपली सत्ता गमावण्याची भीती वाटते. त्यांच्यासाठी मनुष्यवाद संविधानापेक्षा मोठा आहे. सरकारला सत्य आवडत नाही. भाजपाला माहीत आहे की ते हे विधेयक प्रत्यक्षात मंजूर करु शकत नाहीत. ही एक घाबरलेली प्रतिक्रिया आहे. हे विधेयक देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे आणि पंतप्रधानांना असा संदेश द्यायचा आहे की ते महिलांच्या बाजूनं आहेत. “बालाकोटचे जादूगार, बालासोरचे जादूगार, ऑपरेशन सिंदूरचे जादूगार… राहुल गांधींच्या या वक्तव्यांमुळं संसदेत मोठा गदारोळ झाला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला आणि म्हणाले की, देशातील 1.4 अब्ज जनतेने पंतप्रधानांना निवडून दिलं आहे. अशी भाषा विरोधी पक्षनेत्याला शोभत नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांचा उल्लेख करण्याच्या राहुल गांधींच्या कृतीचा निषेध केला आणि म्हणाले की, त्यांना “जादूगार” संबोधून ते कोणत्याही व्यक्तीचा अपमान करत नाहीत; ते देशातील जनतेचा अपमान करत आहेत. राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts