Sanjay Raut Slow Poisoning : राजकारणात शह-काटशह आपण पाहिलेत, सत्तासंघर्ष पाहिला, पण आता थेट राजकीय नेत्याचा काटा काढण्यासाठी स्लो पॉयझनिंगचा वापर झालाय का? असाच एक खळबळजनक संशय ठाकरेंचे शिलेदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय…. “मला तुरुंगात असताना जेवणातून विष दिलं गेलं असावं.. हा संजय राऊतांचा थेट संशय आहे… आणि धक्कादायक बाब म्हणजे, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राऊतांना टॉक्सिक टेस्ट करण्याचा सल्ला दिलाय…. काय आहे हा संपूर्ण प्रकार?
शिवसेनेची तोफ… मविआचे मुख्य रणनीतीकार.. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांना ऑर्थर रोड तुरुंगात जावं लागलं होतं. पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊतांची तब्येत सातत्याने खालावत गेली. पुढे त्यांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागला. पण हा आजार नैसर्गिक आहे की यामागे कोणतं मोठं कारस्थान आहे? हा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण स्वतः संजय राऊत यांनी त्यांना तुरुंगात स्लो पॉयझन दिलं गेल्याचा संशय व्यक्त केलाय….
संजय राऊतांनी तुरुंगातील काळाबाबत काय दावा केला? ( Sanjay Raut Slow Poisoning )
काही दिवसांपूर्वी दिल्लीत संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट झाली. राऊतांची प्रकृती पाहून राहुल गांधींनी संशय व्यक्त केला. तुरुंगात असताना राऊतांच्या शरीरात काही विषारी घटक सोडले गेले का? याची खात्री करण्यासाठी राहुल गांधींनी त्यांना टॉक्सिक टेस्ट करण्याचा सल्ला दिला होता ही अशी टेस्ट आहे, ज्यातून शरीरात वर्षभरापूर्वी जरी कोणतं रासायनिक विष किंवा स्लो पॉयझन गेलं असेल, तर त्याचा शोध घेता येतो….
राउतांच्या या मुद्द्यावर रोहित पवारांनी सुद्धा मोठा दावा केलाय, या देशात आजच्या काळात काहीही होऊ शकतं, गेल्या काही वर्षांत अनेक नेत्यांचा हळूहळू आजारी पडून मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू बद्दलही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे, विरोधी पक्षातील नेत्यांनी आता सावध रहिल पाहिजे, त्याचसोबत भाजपतीलाही काही लोकांनी सावध राहिल पाहिजे असा मोठा दावा रोहित पवारांनी केलीये..
हेही वाचा : गणपतीसाठी कोकणात जाणार असाल तर मोठी बातमी! 173 एसटी बस
राऊतांनी ४ मोठे दावे केलेत…
1. ऑर्थर रोड तुरुंगात असताना जेवणातून ‘स्लो पॉयझनिंग’चा संशय..
2. तुरुंगातून बाहेर आल्यावरच कॅन्सर आणि इतर आजार बळावले.
3. राहुल गांधींनी तब्येत पाहून दिला टॉक्सिक टेस्टचा सल्ला.
4. तुरुंगात जाऊन आलेल्या इतरही बड्या नेत्यांशी यावर झाली चर्चा….
संजय राऊतांच्या या दाव्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधक या प्रकरणावर काय बोट ठेवतात आणि आणि सत्ताधारी यावर कसं प्रत्युत्तर देणार हे पाहन महत्वाचं ठरेल… पण प्रश्न उरतोच… जर राऊतांच्या टॉक्सिक टेस्टमध्ये काही संशयास्पद आढळलं, तर देशाच्या राजकारणातला हा सर्वात मोठा आणि भयानक कट ठरेल का?
Sanjay Raut Toxic Test : संजय राऊत आता राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार ही टॉक्सिक टेस्ट करणार आहेत. या टेस्टचा रिपोर्ट काय येतो आणि यातून काय सत्य बाहेर येतं, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. कारण हा केवळ एका नेत्याच्या आरोग्याचा प्रश्न नाही, तर लोकशाहीतल्या यंत्रणांवर उपस्थित झालेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे….









