• Home
  • महाराष्ट्र
  • वाल्मीक कराडला बीडहून नागपूरला हलवा! जेल की 5 स्टार हॉटेल?
Top News

वाल्मीक कराडला बीडहून नागपूरला हलवा! जेल की 5 स्टार हॉटेल?

Walmik Karad

Walmik Karad : ठिकाण बीडचं जेल… जेलमधली बराक क्रमांक 9… आणि या बराकीत गेल्या दीड वर्षांपासून ठाण मांडून बसलाय… वाल्मीक कराड! मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हाच तो मुख्य आरोपी… वाल्मीक कराड! पण आत काय चाललंय? आत त्याला मिळतेय चक्क VIP ट्रीटमेंट! व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा आणि मोबाइल वापरण्याची मुभा!आणि तो आत बसूनच बाहेर पसरवतोय… दहशत! कराडला मिळणाऱ्या या VIP ट्रीटमेंटबाबत थेट कारागृह अधिक्षकांकडं कुणी केली तक्रार? बीडच्या जेलात कैद्यांना मिळणाऱ्या सुविधांविषयी थेट गृहमंत्री अमित शाह यांची कुणी घेतली भेट? आणि कराडला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये हलवा, अशी मुख्यमंत्र्यांकडं कुणी केली मागणी? पाहूयात, यावरचा हा खळबजनक रिपोर्ट… वाल्मीक कराडला बीडहून नागपूरला हलवा! जेल की 5 स्टार हॉटेल?

बीड कारागृहातून वाल्मीक कराड व्हिडिओ कॉल करत असल्याचा गंभीर आरोप ( Walmik Karad )

बीडचं उपजिल्हा कारागृह कधी नव्हेत ते चर्चेत आलं ते एका आरोपीमुळं…. नाव वाल्मीक कराड. 31 डिसेंबर 2025 पासून हा कराड या जेलमध्ये आहे पण त्याच्या नावाची आणि दहशतीची चर्चा आजही होतेच आहे. जेलमध्ये बसून हा काय काय कारनामे करतोय माहितीये? संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड कारागृह अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रानुसार, हा वाल्मीक कराड इतर कैद्यांच्या नावावर मोबाईल वापरतो, वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधतो, दुपारच्या बंदीच्या काळात राजरोसपणे अधीक्षक कार्यालयात बसून व्हिडिओ कॉल करतो, बराक क्र. 9 जवळ CCTV च नसल्यानं तिथूनच फोनवर बोलतो आणि जेलमधूनच बाहेर दहशत पसरवतो…

संतोष देशमुखांची हत्या झाली 9 डिसेंबर 2024 ला, खटला सुरू झाला 12 मार्च 2025 ला पण गेली सव्वा वर्ष सुनावणी होऊनही खटल्याची प्रगती कुठवर पोचली… फक्त तारीख पे तारीख!

हेही वाचा : विजय थलपती सरकार अडचणीत? उदयनिधी अटकेनंतर चर्चांना उधाण

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी केली? ( Supriya Sule )

धनंजय देशमुखांची तक्रार खासदार सुप्रिया सुळेंनी गांभीर्यानं घेतली आणि हा तर न्यायप्रक्रियेचा थेट अपमान असून आरोपी वाल्मीक कराडची बीड कारागृहातून ( Beed Jail ) नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करा, अशी मागणीच मुख्यमंत्र्यांकडं केली. इतकंच नव्हे, तर बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी करा, आरोपीला मदत करणारे संबंधित कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी आग्रहाची मागणी केली.बीडच्या कारागृहात कैद्यांना मिळणाऱ्या या बेकायदेशीर सोयीसुविधांच्या तक्रारीचा सूर आता थेट दिल्लीपर्यंत गेलाय. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन बीड कारागृहातील गंभीर तक्रारींची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीच लावून धरली.

खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत काय मांडलं?

खा. बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना या मागणी संदर्भात पत्रही दिलं. बीड उप जिल्हा कारागृहात काही कैद्यांना मोबाईल, प्रतिबंधित वस्तू पुरवल्या जातात. त्यांना विशेष अधिकार पुरवणाऱ्या संशयास्पद अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशा आशयाचं तर सोनवणे यांनी शाह यांच्याकडं सादर केलं. महाराष्ट्र सरकारकडून याचा अहवाल मागवून घेऊन सक्षम प्राधिकरणाकडून चौकशी केली जावी आणि दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीये. त्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन कार्यवाहीचे आदेश दिल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.बीडच्या जेलचा कारभार पारदर्शक होण्यासोबतच दोषींवर कारवाई होईपर्यंत आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहणार, असं सोनवणे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आता जाता जाता या प्रकरणातून समोर आलेल्या 3 गंभीर गोष्टी मांडतो आणि थांबतो…कोर्टात खटला सुरू आहे आणि आरोपी जेलमधूनच बाहेर दहशत पसरवतोय? मग साक्षीदार सुरक्षित राहतील का? हा तर न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे. बंदीच्या वेळेत अधीक्षक कार्यालयातून व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणं, जिथून फोन केला जातो तिथं CCTV च नसणं हे कुणाच्या वरदहस्तामुळं घडतंय? हा तर कारागृह प्रशासनाचा सरळसरळ अपमान आहे आणि धनंजय देशमुख आपल्या तक्रारपत्रात थेट ‘राजकीय प्रभाव’ हा शब्द वापरतात म्हणजे या सर्व प्रकरणाच्या पाठीशी नक्कीच कुणी तरी आहे याचा वास येतोय. आता तुम्हीच सांगा हे बीडचं जेल आहे की 5 स्टार हॉटेल? वाल्मीक कराडसाठी ते VIP लाऊंज बनलंय का?

Santosh Deshmukh Murder Case : 9 डिसेंबर 2024 ला एका सरपंचाची हत्या होते, त्यावर सव्वा वर्ष उलटून जातं पण खटल्याला गती मिळत नाही आणि याच खटल्यातला एक आरोपी जेलमध्ये बसून सिस्टम चालवतोय? धनंजय देशमुख विचारतायत, आम्हाला न्याय कधी मिळणार? सुप्रिया सुळे म्हणतायत, हा तर न्यायप्रक्रियेचा अपमान आणि बजरंग सोनवणे तिकडं दिल्लीत जाऊन दाद मागतायत.
प्रश्न एकच, कायदा सगळ्यांसाठी समान आहे ना? की आरोपीचं नाव मोठं असलं तर त्याला जेलमध्ये पण VIP ट्रीटमेंट? या वाल्मीक कराडला बीडहून नागपूरला हलवलं पाहिजे का?

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts