• Home
  • लाईफस्टाईल
  • कंगना vs हृतिक वाद पुन्हा पेटला! व्हायरल पोस्टनंतर सोशल मीडियावर नवा राडा
Top News

कंगना vs हृतिक वाद पुन्हा पेटला! व्हायरल पोस्टनंतर सोशल मीडियावर नवा राडा

Kangana vs Hrithik

Kangana vs Hrithik : कंगना रनौत आणि हृतिक रोषण ( Hrithik Roshan ) यांचा वाद जवळपास मिटलाच होता पण पुन्हा एकदा मोठा वणवा पेटलाय. २०१६ मध्ये सुरू झालेलं हे हाय व्होल्टेज नाटक आज २०२६ मध्ये कंगना रणौत ( Kangana Ranaut ) आणि हृतिक रोशन… बॉलिवूडच्या इतिहासातील असा एक राडा राख कितीही शांत झाली असं वाटलं, तही थांबायचं नाव घेत नाहीये. इन्स्टाग्राम आणि एक्सवर एका वेगळ्याच लेव्हलचा राडा सुरू आहे. इंटरनेटवर नवीन आलेल्या पोरांनी, म्हणजेच आपल्या जेन झी गँगने या जुन्या वादाला असं काही तोंड फोडलंय की दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा शब्दांचे बाण सुटायला लागलेत. हा वाद नेमका काय आहे, तो आता अचानक पुन्हा का पेटला आणि आजची तरुण पिढी कंगनाला कशी ट्रोल करतेय, याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा आपण आज पाहणार आहोत….

कंगना आणि हृतिक वादाची सुरुवात कशी झाली? ( Kangana vs Hrithik )

सगळ्यात आधी समजून घेऊया की हा वाद नेमका काय आहे ? या संपूर्ण राड्याची सुरुवात साधारण २०१६ च्या सुमारास झाली होती, पण त्याची पाळंमुळं त्याच्याही आधी क्रिश ३ आणि काइट्स या सिनेमांच्या शूटिंग दरम्यान रोवली गेली होती. कंगनाचा दावा असा होता की हृतिक आणि तिच्यामध्ये अफेअर होतं, दोघं रिलेशनशिपमध्ये होते. पण हृतिकने सुरुवातीपासून या गोष्टीला साफ नकार दिला. वाद तेव्हा पेटला जेव्हा कंगनाने एका मुलाखतीत हृतिकचं नाव न घेता सिली एक्स असा उल्लेख केला. तिने म्हटलं की, लक्ष वेधून घेण्यासाठी काही सिली एक्स कशी मूर्खपणाची कृत्यं करतात. हे ऐकल्यावर हृतिकचा इगो दुखावला. त्याने कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आणि तिथून बॉलिवूडमधल्या सर्वात मोठ्या कोर्टकचेरीच्या आणि चिखलफेकीच्या लढाईला सुरुवात झाली. हृतिकचं म्हणणं होतं की कंगनाला मानसिक आजार आहे, ती स्वतःच स्वतःच्या कल्पनेत जगतेय आणि तिने त्याला हजारो वैयक्तिक ईमेल्स पाठवले आहेत. दुसरीकडे कंगनाने आरोप केला की हृतिकने तिचा लॅपटॉप आणि ईमेल हॅक केला जेणेकरून त्यांच्यातील पुरावे मिटवता येतील.

हेही वाचा : विजय थलपती सरकार अडचणीत? उदयनिधी अटकेनंतर चर्चांना उधाण

2026 मध्ये वाद पुन्हा का चर्चेत आला? ( Kangana vs Hrithik )

हा वाद इतका वाढला की यात सायबर सेल, पोलीस, वकील आणि अख्खं बॉलिवूड दोन गटात विभागलं गेलं. अनेक वर्ष कोर्टात आणि मीडियात एकमेकांचे कपडे धुतल्यानंतर हा वाद कुठेतरी थंड झाला होता, पण आता विषय येतो की, इतकी वर्ष शांत असलेला हा ज्वालामुखी आता २०२६ मध्ये अचानक पुन्हा का फाटला? तर याला कारणीभूत ठरली ती सोशल मीडियाची ताकद आणि सध्या देशात सुरू असलेल्या घडामोडी. नुकतंच एका विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून कंगना रणौतने एक वादग्रस्त विधान केलं. ती खासदार आहे, त्यामुळे तिच्या प्रत्येक विधानाला राजकीय आणि सामाजिक वजन असतं. तिने केलेल्या या विधानानंतर सोशल मीडियावर तिच्याविरोधात संताप निर्माण झाला.

लोक तिच्या जुन्या विधानांचा, तिच्या वागण्याचा आणि तिच्या स्वभावाचा पंचनामा करायला लागले. याच दरम्यान इंटरनेटवर एका युझरने एक जुनी पोस्ट शेअर केली, बघता बघता त्या एका पोस्टवरून अख्ख्या सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड सुरू झाला, ज्याचं नाव होतं वी नीड टू अपोलायझ टू हृतिक…. हा ट्रेंड सुरू होण्यामागचं कारण असं की, जेव्हा २०१६ मध्ये हा वाद झाला होता, तेव्हा सुरुवातीला मीडिया आणि जनतेने कंगनाला विक्टिम समजून खूप सपोर्ट केला होता. एक एकटी मुलगी एवढ्या मोठ्या स्टार खानदानाशी लढतेय म्हणून लोक हृतिकला व्हिलन ठरवत होते. पण आता काळ बदललाय. लोकांच्या हातात जुने ईमेल्स, कोर्टाचे कागदपत्र आणि तथ्यं आली आहेत. त्यामुळे आजची तरुण पिढी म्हणतेय की, आपण त्या काळात कंगनाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हृतिकवर विनाकारण अन्याय केला, त्याला मानसिक त्रासातून जावं लागलं, त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून हृतिकची माफी मागितली पाहिजे.

कंगना रणौतची प्रतिक्रिया काय? ( Kangana Ranaut )

हा ट्रेंड इतका वेगाने पसरला की तो हृतिक रोशन ( Hrithik Roshan ) पर्यंत पोहोचला. आता हृतिक सहसा अशा वादांपासून लांब राहतो, पण या वेळी त्याने एका व्हायरल पोस्टवर एक छोटीशी कमेंट केली. त्याने लिहिलं की, तथ्ये समोर येण्याची मी अजूनही वाट पाहत आहे. हृतिकची ही एक कमेंट सोशल मीडियावर आली आणि आगीत पेट्रोल पडलं. हृतिकची कमेंट बघून कंगनाचा पारा पार गगनाला भिडला. तिने हृतिकला सुनावलं की, आगीत तेल ओतणं बंद कर. कंगनाने लिहिलं की, जेव्हा जेव्हा मला ट्रोल केलं जातं, तेव्हा तू तुढं तोंड उघडून त्यात उडी मारतोस. तुला जर खरंच एवढी काळजी असेल, तर तुझ्या नावाचा वापर करून जे लोक मला बदनाम करत आहेत, त्यांच्यावर तू कायदेशीर कारवाई का करत नाहीस? इतकंच नाही, तर कंगनाने हृतिकची सध्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिचाही उल्लेख केला.

तिने म्हटलं की, तुझ्या आयुष्यात आता दुसरी कोणीतरी आहे, तिच्यासोबत सुखाने राहा, माझ्या जुन्या प्रकरणांमध्ये नाक खुपसणं बंद कर. कंगनाच्या या अवताराने इंटरनेटवर पुन्हा एकदा दोन गट पडले आणि हा वाद अगदी नवीन असल्यासारखा पेटला. आता या संपूर्ण प्रकरणातला महत्त्वाचा भाग म्हणजे’जेन झी कडून कंगनाला केलं जाणारं ट्रोलिंग. कंगनाला ट्रोल करण्यासाठी या पोरांनी भारी डोकेबाज कृती शोधल्या आहेत. त्यांनी कंगनाच्या जुन्या विधानांचे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स शोधून काढल्या आहेत. जेव्हा कंगना स्वतःला खूप शांत किंवा देशभक्त दाखवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा हे जेन झी युझर्स तिच्या जुन्या मुलाखतींमधील क्लिप्स शेअर करतात, ज्यात ती हृतिकबद्दल किंवा बॉलिवूडबद्दल अत्यंत टोकाचं बोलताना दिसते.

हेही वाचा : विजय थलपती सरकार अडचणीत? उदयनिधी अटकेनंतर चर्चांना उधाण

Gen Z कडून कंगनाला ट्रोल का केलं जात आहे?

म्हणजे कंगनाच्याच एका विधानाने तिच्या दुसऱ्या विधानाचा कसा गेम होतो, हे ते दाखवून देतात. जेव्हा तुमचा क्रश तुम्हाला रिप्लाय देत नाही, तेव्हा कंगनासारखे ईमेल पाठवा, अशा आशयाचे मीम्स इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहेत. हृतिकच्या गाण्यांवर कंगनाचे फोटो लावून किंवा कंगनाच्या संवादांवर हृतिकचे डान्स व्हिडिओ जोडून कंटेंट तयार केला जातोय, ज्याला लाखो व्ह्यूज मिळत आहेत.

पोरांचं म्हणणं असं आहे की, कंगनाला प्रसिद्धीच्या झोतात राहिल्याशिवाय चैन पडत नाही आणि जेव्हा तिची ही युक्ती फ्लॉप होते, तेव्हा ती हृतिकच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःला बिचारी दाखवण्याचा प्रयत्न करते. ट्विटरवर तिच्या प्रत्येक पोस्टच्या खाली हृतिक भाऊ जिंकला, कंगना ताई हरली’अशा पद्धतीचे वन-लाइनर्स टाकून तिला डिवचलं जातंय. या ट्रोलिंगमुळे कंगना अधिकच चिडते आणि जितकी ती चिडते, तितका या पोरांना मीम्स बनवायला नवीन मसाला मिळतो.

एका बाजूला कंगना रणौत आहे, जी आपल्या आक्रमक स्वभावासाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर दुसऱ्या बाजूला हृतिक रोशन आहे, जो अत्यंत संयमी राहून योग्य वेळी अचूक वार करतो. आणि या दोघांच्या लढाईत मज्जा घेतेय ती आजची इंटरनेटवरची तरुण पिढी, जी एका रात्रीत कोणालाही हिरो आणि कोणालाही झिरो बनवू शकते.
सध्या तरी या वादाचं पारडं हृतिकच्या बाजूने झुकल्यासारखं दिसतंय कारण सोशल मीडियावर हृतिकला मिळणारा पाठिंबा मोठा आहे. पण कंगना सहजासहजी हार मानणाऱ्यांमधली नाही. त्यामुळे हा वाद इथेच संपणार की याचे आणखी काही अंक पाहायला मिळणार, हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा….

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts