Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Sharad Pawar Health Update : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून केली प्रकृतीची विचारपूस
ताज्या बातम्या

Sharad Pawar Health Update : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून केली प्रकृतीची विचारपूस

Sharad Pawar Health Update
4
  • शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

  • शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पुढील वैद्यकीय अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

शरद पवारांना रुबी हॉलमधून डिस्चार्ज

शरद पवार यांना २ नोव्हेंबर रोजी खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय तपासण्या आणि निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी डिस्चार्जच्या वेळी पवार यांची प्रकृती स्थिर असून ते बरे असल्याची माहिती दिली होती. (Sharad Pawar Health News)

पुढील तपासण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल (Breach Candy Hospital)

रुबी हॉलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांना पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. त्यांनी वडिलांना पुढील तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल करत असल्याचे सांगितले आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले. (Sharad Pawar Hospitalized)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन

शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी पवार यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. तसेच, सुप्रिया सुळे आणि आपण देशाची काळजी घेऊ, तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्या, असे मोदी यांनी सांगितल्याचे माध्यमातून स्पष्ट झाले. पवार यांनीही मोदींचे आभार मानत आपण विश्रांती घेत असल्याचे सांगितले. अशी माहिती पवार कुटूंबाचे मित्र विठ्ठल मणियार यांनी दिली. (PM Narendra Modi)

राजकीय वर्तुळातून प्रकृतीची विचारपूस

शरद पवार यांच्या रुग्णालयात दाखल होण्याची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात आहे. विविध पक्षांतील नेते आणि समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राजकीय नेत्यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेटीगाठी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. (Sharad Pawar Latest News)

तसेच, महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत हे देखील शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल. विविध पक्षांतील नेत्यांकडून होत असलेल्या या भेटींमुळे शरद पवार यांच्या प्रकृतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा अन् दुसऱ्याच दिवशी मोदी भेटीला; नेमकं शरद पवारांच्या भेटीमागचं कारण काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts