• Home
  • फूड
  • रोजच्या नाश्त्याला द्या नवा ट्विस्ट! फक्त काही मिनिटात रव्यापासून बनवा मुलांसाठी ३ हेल्दी आणि चविष्ट पदार्थ
फूड

रोजच्या नाश्त्याला द्या नवा ट्विस्ट! फक्त काही मिनिटात रव्यापासून बनवा मुलांसाठी ३ हेल्दी आणि चविष्ट पदार्थ

Healthy Rava Breakfast Recipes

Healthy Rava Breakfast Recipes: रोजच्या नाश्त्यात मुलांना काहीतरी वेगळं आणि पौष्टिक खायला द्यायचं असेल, तर रव्यापासून तयार होणारे हे पदार्थ उत्तम पर्याय ठरू शकतात. कमी वेळात तयार होणाऱ्या या ४ रेसिपी चविष्ट हेल्दी आणि मुलांच्या आवडीच्या आहेत.

मुलांना रोज पोहे, उपमा किंवा ब्रेड खायचा कंटाळा येत असेल, तर रव्यापासून बनणारे काही वेगळे आणि पौष्टिक पदार्थ नक्की करून पाहा. रवा पचायला हलका असून त्यात भाज्यांचा समावेश केल्यास नाश्ता अधिक पौष्टिक (Healthy Rava Breakfast Recipes) बनतो. सकाळच्या धावपळीत हे पदार्थ कमी वेळात तयार होतात आणि मुलानांही आवडीने खाता येतात.

हेही वाचा: टॅरो कार्ड्सचा इशारा! आज ‘या’ राशींना मिळू शकते मोठी आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

रवा मिनी इडली (Rava Mini Idle Recipes)

रवा, दही आणि पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा. त्यात गाजर, मटार आणि कोथिंबीर मिसळा. वाफवण्यापूर्वी थोडे इनो किंवा बेकिंग सोडा घाला. मिनी इडलीच्या साच्यात हे मिश्रण घालून वाफवा. सांबार किंवा नारळाच्या चटणीसोबत हा नाश्ता अधिक चविष्ट लागतो.

रवा व्हेज टोस्ट (Rava Veg Toast)

रव्याच्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि थोडी मिरीपूड घाला. हे मिश्रण गव्हाच्या ब्रेडवर पसरवा आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजा. मुलांसाठी हा झटपट तयार होणारा आणि पोटभर नाश्ता आहे.

रवा व्हेज पॅनकेक (Rava Veg Pancake)

एका भांड्यात रवा, दही आणि थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा. 10-15 मिनिटे मुरू द्या. त्यानंतर किसलेले गाजर, पालक, शिमला मिरची, कोथिंबीर आणि चिमूटभर मीठ घाला. तव्यावर थोडे तूप किंवा तेल लावून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

नाश्ता अधिक पौष्टिक करण्यासाठी (Morning Recipes)

रव्याचे पदार्थ बनवताना शक्य तितक्या ताज्या भाज्या वापरा. जास्त तेल किंवा बटर टाळा आणि मुलांच्या वयानुसार सौम्य मसाले वापरा. नाश्ता नेहमी ताजा तयार करून दिल्यास चव आणि पोषणमूल्ये दोन्ही टिकून राहतात.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts