Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • E20 इंधन वाद : अमेरिकेच्या दबावामुळे भारतात इथेनॉल सक्तीचं? केजरीवाल-राकेश टिकैत यांचे गंभीर आरोप
Top News

E20 इंधन वाद : अमेरिकेच्या दबावामुळे भारतात इथेनॉल सक्तीचं? केजरीवाल-राकेश टिकैत यांचे गंभीर आरोप

E20 Fuel

E20 Fuel : केंद्र सरकारने इंधनात इथेनॉल मिक्स करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचा सर्वात जास्त फायदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मुलाला झाल्याचा आरोप होत आहे…मात्र आता माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी वेगळाच दावा केला आहे…सरकारने E 20 धोरण अमेरिकेच्या दबावामुळे रावबलं आहे..अमेरिकेने भारतावर दबाव आणून हा निर्णय घ्यायला लावला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे..तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे झाला आहे, असा दावा राकेश टिकैत यांनी केला आहे…त्यामुळे खरं कारण काय आहे? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल..त्यामुळे या व्हिडिओतून जाणून घेऊयात की इथेनॉलची गरज भारताला आहे का? E 20 पेट्रोलमुळे खरंच भारताचा फायदा होत आहे का? अमेरिकेकडून भारत इथेनॉल का खरेदी करत आहे? अरविंद केजरीवाल यांचा दावा काय आहे?

E20 इंधन धोरणावरून केंद्र सरकारवर विरोधकांचे गंभीर आरोप ( E20 Fuel )

केंद्र सरकारने E 20 इंधन सक्तीचं केलं..इथेनॉलमुळे आपण जे दुसऱ्या देशाकडून इंधन आयात करतो, त्यासाठी खर्च होणारा पैसा वाचेल, तसंच या इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होईल, असं सरकारकडून म्हटलं गेलं…भारतातील सर्व पेट्रोल पंपावर E 20 पेट्रोल मिळालायला सुरुवात झाली…पण काही दिवसांनी गाड्यांच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊ लागली…नागरिकांना काही समजेना की अचानक गाड्यांमध्ये बिघाड का होत आहे? काही दिवसांनी कळालं की सध्याच्या गाड्यांचे इंजिन हे E 20 इंजिनसाठी डिझाईन केलेले नाही…त्यामुळे गाड्यांचे इंजिन खराब होत आहे…या विरोधात नागरिकांमध्ये आता आक्रोश पाहायला मिळत आहे…केंद्रीय नितीन गडकरी यांनी इथेनॉल बाबत अनेकदा वक्तव्य केलं होतं..यामुळे आता नितीन गडकरींच्या मुलांना फायदा पोचोवण्यासाठी इथेनॉल सक्तीचे करण्यात आले असा आरोप होतो..तसंच गडकरींच्या मुलांना कोट्यावधी रूपयांचा फायदा झाल्याची आरोप आहे…पण हे सर्व आरोप फेटाळत हा निर्णय पेट्रोल मंत्र्यालयाचा असल्याचे नितीन गडकरींनी म्हटलं..

हेही वाचा : विजय थलपती सरकार अडचणीत? उदयनिधी अटकेनंतर चर्चांना उधाण

E20 इंधन वाद : अमेरिकेच्या दबावामुळे भारतात इथेनॉल सक्तीचं?

E 20 वरून नितीन गडकरींच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे…यातच दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी मोठं आंदोलन केलं…या आंदोलनादरम्यान त्यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे… केजरीवाल यांनी आरोप केला आहे की, भारत सरकार देशातील वाहनधारकांवर सक्तीने E20 पेट्रोल लादत आहे आणि यामागे एक मोठे गुप्त उद्दिष्ट आहे…अमेरिका हा जगातील सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश आहे, जिथे गरजेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात इथेनॉलची निर्मिती केली जाते आणि तिथे त्याचा पूर्ण वापर होऊ शकत नाही.. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी कराराबाबत बोलणी सुरू आहेत… याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर त्यांचे इथेनॉल खरेदी करण्यासाठी दबाव आणला आणि केंद्र सरकारने या दबावासमोर पूर्णपणे घुटने टेकले, असा थेट आरोप केजरीवाल यांनी केला आहे.. पुढील 5 वर्षांत भारत अमेरिकेकडून तब्बल 20अब्ज डॉलर्स किमतीचे इथेनॉल खरेदी करणार असून, गरज नसतानाही हे इथेनॉल भारतात आणून ते सक्तीने पेट्रोल पंपांच्या माध्यमातून जनतेच्या माथी मारलं जात आहे, असेही ते म्हणाले.

E20 इंधनामुळे इंजिन खराब होत असल्याच्या दाव्यांवर सरकारचं उत्तर

या सक्तीच्या धोरणामुळे देशातील कोट्यवधी वाहनचालकांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे… इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे इंजिन खराब होत असून वाहनांचे मायलेज लक्षणीय घटले आहे, असा आरोप केजरीवालांनी केला.. या समस्येविरोधात पक्षाने चालवलेल्या ऑनलाइन याचिकेत २ लाख ३० हजारहून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून विरोध दर्शवला आहे. “जनतेला पेट्रोल पंपांवर शुद्ध पेट्रोल आणि E20 पेट्रोल यांपैकी निवड करण्याचा पर्याय मिळाला पाहिजे… तसंच कमी कार्यक्षमता असलेल्या E20 पेट्रोलचे दर सामान्य पेट्रोलपेक्षा कमी असायला हवेत,” अशा प्रमुख मागण्या केजरीवाल यांनी पंतप्रधानांकडे केल्या आहेत..

तसंच नांदेडमध्ये शेतकरी बैठकीवेळी राकेश टीकेत यांनी देखील गंभीर आरोप केला आहे…अमेरिकेसोबत बियाण्यांसंदर्भात करार करण्याचा सरकारचा विचार होता… या करारावर संसदेत चर्चा होणे आवश्यक होते.. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे संसदेचे कामकाज सुरळीत सुरू राहिले नाही आणि या विषयावर चर्चा होऊ शकली नाही… त्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला असा दावा राकेश टिकैत यांनी केला आहे..

हेही वाचा : ‘धनुष्यबाण’ चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे की ठाकरे गटाकडे राहणार चिन्ह?

E20 इंधन धोरणावरून केंद्र सरकारवर विरोधकांचे गंभीर आरोप

दरम्यान, केंद्र सरकार आणि भाजपने अरविंद केजरीवाल यांचे हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून ते अत्यंत दिशाभूल करणारे आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.. सरकारच्या ‘पीआयबी फैक्ट चेक’ आणि अधिकृत माहितीनुसार, भारत सरकार आपल्या ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरणा’ अंतर्गत देशांतर्गत उत्पादित इथेनॉलचाच वापर करत आहे.. हे इथेनॉल भारतातीलच साखर कारखाने आणि डिस्टिलरीजमधून ऊसाचा रस, मका, खराब झालेले अन्नधान्य आणि तांदूळ यांपासून बनवले जाते, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळत आहे.. केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, हे धोरण देशाचे कच्चे तेल आयातीवरील परकीय चलनाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वैज्ञानिक चाचण्यांनंतरच लागू करण्यात आले आहे.. भाजप आणि केंद्र सरकारने विरोधकांवर केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा पलटवार केला आहे…

सरकारने सध्या कोणताही दावा केला तरी इथेनॉलने गाड्या खराब होत असल्याने नागरिकांमध्ये सध्या आक्रोश पाहायला मिळत आहे…सरकारने जर E 20 धोरणावर लवकरच तोडगा काढला नाही, तर आंदोलन पेटण्याची शक्यता आहे…तुम्हाला काय वाटतं E 20 इंधन सरकारने सक्तीचं का केलं असेल कमेंट करून सांगा…

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts