Supreme Court: शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या दाव्याशी संबंधित प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या भवितव्याच्या दृष्टीने या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्षाचे नाव, ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी (Supreme Court) होणार आहे. वेळेअभावी मंगळवारी होऊ न शकलेली सुनावणी अय बुधवारी दुपारी घेण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बुधवारी सुनावणीसाठी वेळ देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार दुपारी २ वाजता या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: रेपो रेटचा फैसला आज! EMI कमी होणार की व्याजदर कायम राहणार?
तीन वर्षांपासून प्रलंबित आहे प्रकरण
शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह कोणाकडे राहणार, तसेच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकरणावर अंतिम निर्णय झालेला नाही.
दीर्घ प्रतीक्षेनंतर मागील आठवड्यात या प्रकरणावर सुनावणीला सुरुवात झाली होती. त्यावेळी शिवसेनेच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता. त्यांचा उर्वरित युक्तिवाद पुढे सुरू राहणार आहे.
सुनावणीला प्राधान्य देण्याची मागणी
मंगळवारी वेळेअभावी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी बुधवारी या प्रकरणाची सुनावणी घेण्याबाबत विचारणा केली. यावर कपिल सिब्बल यांनी सहमती दर्शवत प्रकरणाला प्राधान्याने वेळ देण्याची विनंती केली.
आता बुधवारी होणाऱ्या सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पुढे जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे शिवसेनेचे दोन्ही गट आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
FAQ
1. सुप्रीम कोर्टात आज कोणत्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे?
उत्तर: शिवसेनेचे पक्षाचे नाव, ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
2. ‘धनुष्यबाण’ चिन्हावरील वाद कशामुळे सुरू झाला?
उत्तर: शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणाकडे राहणार, यावरून हा वाद निर्माण झाला.
3. या प्रकरणात शिवसेनेच्या बाजूने कोण युक्तिवाद करत आहेत?
उत्तर: शिवसेनेच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहेत.
4. या सुनावणीचे महत्त्व काय आहे?
उत्तर: या सुनावणीचा निकाल शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या राजकीय भवितव्यावर तसेच पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि आमदारांच्या पात्रतेशी संबंधित मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकतो.









