Pune Lohgaon Crime: पुण्यातील लोहगाव परिसरातून (Pune Lohgaon Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३१ जुलै रोजी लोहगाव येथील कलवड वस्ती परिसरात घडली. या प्रकरणी बाळाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, घरगुती कारणावरून सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचा आरोप आहे.
हेही वाचा: ‘धनुष्यबाण’ चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; शिंदे की ठाकरे गटाकडे राहणार चिन्ह?
कौटुंबिक वादातून धक्कदायक प्रकार ( Pune Lohgaon Crime )
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या कुटूंबातील काही सदस्यांमध्ये वाद सुरू होता. याच वादातून आरोपी महिलेने घरात झोपलेल्या बाळासोबत अमानुष कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने बाळाला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे बाळाची प्रकृती सुधारली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप
तक्रारीमध्ये आरोपींकडून पोलिसांत माहिती दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.









