Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सिद्धिविनायक देणगी प्रकरणात शिंदे ॲक्शन मोडवर; गेल्या 5 वर्षांच्या मंदिर व्यवहारांचे होणार विशेष ऑडिट
Mumbai

सिद्धिविनायक देणगी प्रकरणात शिंदे ॲक्शन मोडवर; गेल्या 5 वर्षांच्या मंदिर व्यवहारांचे होणार विशेष ऑडिट

Siddhivinayak Temple

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिरातील (Siddhivinayak Temple) देणगी व्यवहारांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मंदिरातील गेल्या ५ वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील देणगी (Siddhivinayak Donation Audit) व्यवस्थापनाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांनंतर प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. मंदिरातील मागील पाच वर्षांच्या देणगी व्यवहारांची विशेष तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आर्थिक नोंदीची सखोल पडताळणी केली जाणार आहे.

या प्रकरणाची दाखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी विशेष लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. मंदिर न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवण यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या बैठकीत मंदिरातील आर्थिक व्यवहार आणि देणगी व्यवस्थापनाबाबत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: पुण्यात संतापजनक घटना! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतलं फेविक्विक; नेमकं प्रकरण काय? पाहा

कोणत्या गोष्टीची होणार तपासणी? ( Siddhivinayak Temple )

या विशेष ऑडिटमध्ये मंदिराला मिळालेल्या विविध प्रकारच्या देणग्यांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये रोख स्वरूपातील देणग्या, सोने- चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू तसेच इतर अर्पणांच्या नोंदींचा समावेश असेल.

याशिवाय देणग्यांची नोंद ठेवण्याची पद्धत, आर्थिक व्यवहारांचे दस्तऐवज, दागिन्यांची नोंदवही आणि संबंधित लेखा अहवाल यांचीही पडताळणी केली जाणार आहे.

अहवालानंतर पुढील निर्णय

विशेष लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाईल. या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या तपासणीतून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि त्यानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे भाविकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

FAQ

1. सिद्धिविनायक मंदिरात विशेष ऑडिट का करण्यात येत आहे?
उत्तर: मंदिरातील देणगी व्यवहारांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करण्यासाठी विशेष ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2. विशेष ऑडिटमध्ये कोणत्या बाबींची तपासणी होणार आहे?
उत्तर: रोख देणग्या, सोने-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू, आर्थिक नोंदी, लेखा दस्तऐवज आणि देणगी व्यवस्थापन प्रक्रियेची पडताळणी केली जाणार आहे.

3. विशेष ऑडिटचे आदेश कोणी दिले?
उत्तर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील गेल्या पाच वर्षांच्या व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

4. ऑडिट अहवालानंतर काय होणार?
उत्तर: विशेष लेखापरीक्षणाचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे प्रशासन पुढील आवश्यक निर्णय घेईल.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts