विज्ञान- तंत्र

गुगलला 48 लाख कोटींचा फटका! शेअर घसरणीमागचं कारण काय?

Google Stock Crash 2026
5

Google Stock Crash 2026 : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण पाहायला मिळत आहे….गेल्या वर्ष भरापासून शेअर बाजारातून गुंतवणूकदारांना कोणतीही मोठी कमाई करता आली नाहीये…तर SIP द्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना देखील वर्षभरापासून कोणताही फायदा झालेला नाही…फायद्यात असलेली SIP मायनसमध्ये गेली आहे…ही झाली भारतातील परिस्थिती….

काल एकाच दिवसात गुगलच्या शेअरमध्ये मोठा भूकंप पाहायला मिळाला आहे…गुगलचे शेअर 12 टक्क्यांनी घसरले असून एकाच दिवसात कंपनीचे तब्बल 48 लाख कोटी रूपयांचा नुकसान झालाय…म्हणजे अंबानी आणि अदानी यांची संपत्ती एकत्रित केली तरीही ती 20 लाख कोटी रूपयांच्या खालीच आहे…मात्र गुगलचे एवढे नुकसान होण्यामागचे कारण काय आहे? पाहूयात…

गुगलच्या शेअरमध्ये भूकंप! (Google Stock Crash 2026)

सध्या जगभरात AI ची रेस पाहायला मिळत आहे…या रेसमध्ये काही अमेरिकन कंपन्या आणि चीनमधील काही कंपन्या पाहायला मिळत आहे…गुगल आणि ओपन AI यासारख्या कंपन्या AI वरती पाण्यासारखा पैसा वाहत आहे…तर चीनमधील कंपन्या स्वस्तात AI बनवताना दिसत आहे…चीनचे काही AI मॉडल गुगलच्या AI मॉडलपेक्षा चांगलं काम करताना दिसत आहे…त्यामुळे गुगल आता AI च्या रेसमध्ये स्वत:ला पुढं ठेवण्यासाठी पाण्यासारखा पैसा वाहताना दिसत आहे…

गुगलची मूळ संस्था ‘अल्फाबेट इंक’चे शेअर अमेरिकन बाजारात व्यवहार सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत १२ ते १३ टक्क्यांनी घसरले… या अभूतपूर्व घसरणीमुळे कंपनीचे 48 लाख कोटी रुपये बाजारमूल्य एका झटक्यात कमी झाले… जागतिक वित्तीय बाजाराच्या इतिहासातील ही एका दिवसातील दुसरी सर्वात मोठी घसरण मानली जात असून, यामुळे संपूर्ण टेक विश्वात खळबळ उडाली आहे… ब्लूमबर्ग आणि रॉयटर्ससारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोठ्या पडझडीमागे गुगलचे बदलणारे धोरण आणि AI वर अफाट खर्च कारणीभूत आहे.

हेही वाचा : ISRO NVS-03 Satellite : भारताची स्वतःची GPS यंत्रणा होणार अधिक सक्षम! NVS-03 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Gemini AI आणि डेटा सेंटर्ससाठी गुगलची अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक

या ऐतिहासिक घसरणीचे मुख्य कारण म्हणजे गुगलने मायक्रोसॉफ्ट आणि ‘OpenAI’ सारख्या तगड्या स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी सुरू केलेली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक ठरली आहे… कंपनीने आपल्या ‘Google Gemini’ या AI मॉडेलच्या विकासासाठी आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अवाढव्य डेटा सेंटर्सच्या उभारणीवर चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत तब्बल ५१.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच ५ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत… तंत्रज्ञानावरील या अफाट खर्चामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण या गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीला तात्काळ कोणताही थेट नफा मिळताना दिसत नाहीये… या महागड्या गुंतवणुकीचा परतावा मिळण्यास अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त काळ लागू शकतो, ज्यामुळे बाजारात भीती पसरली आहे….

गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घालणारी आणखी एक महत्त्वाची आकडेवारी म्हणजे गुगलच्या २२ वर्षांच्या शेअर बाजारातील इतिहासात पहिल्यांदाच कंपनीचा फ्री कॅश फ्लो ‘नकारात्मक’ नोंदवला गेलाय… अफाट खर्चामुळे हा कॅश फ्लो मायनस 9 अब्ज डॉलर्सवर आल्याची माहिती आहे… जेव्हा कोणतीही बलाढ्य कंपनी कमावण्यापेक्षा जास्त खर्च करू लागते, तेव्हा वित्तीय संस्था आपले शेअर्स विकून बाहेर पडण्यास प्राधान्य देतात, आणि नेमके हेच गुगलच्या बाबतीत घडले…म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर गुगलमधून म्युच्युअल फंड, बँका किंवा परदेशी गुंतवणूकदार आपले शेअर विकून पैसे काढत आहेत…

हेही वाचा : US Midterm Election 2026 : ट्रम्प यांना निवडणुकीत धक्का, भारतातील ९ कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध; शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

AI Overview मुळे गुगलच्या जाहिरात व्यवसायावर परिणाम?

याशिवाय, गुगलने युजर्ससाठी आणलेले ‘AI Overview’ हे नवीन सर्च फिचर कंपनीच्या मूळ कमाईच्या मॉडेलसाठी डोकेदुखी ठरत आहे… या फिचरमुळे युजर्सना वेगवेगळ्या वेबसाईटच्या लिंक्स शोधण्याऐवजी थेट AI द्वारे तयार केलेले उत्तर वरतीच मिळतात… यामुळे गुगलवरील सर्चचे प्रमाण तर वाढले आहे..मात्र या थेट उत्तरांमध्ये जाहिराती दाखवून कमाई करणे गुगलला अद्याप पूर्णपणे जमलेले नाही… यामुळे गुगलच्या एकूण जाहिरात महसूल वाढीचा वेग जो पूर्वी 17% वर होता, तो आता घसरून 12% वर आला आहे.. ॲमेझॉन आणि टिकटॉकसारखी माध्यमे डिजिटल जाहिरात क्षेत्रातील गुगलचा वाटा हिरावून घेत असल्याचा फटकाही या घसरणीला बसला आहे…

या नुकसानीची भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीशी तुलना केल्यास भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांची एकूण संपत्ती सुमारे 9 लाख कोटी रुपये आहे, तर मुकेश अंबानी यांची संपत्ती सुमारे 8 लाख कोटी रुपये आहे….दोन्ही उद्योगपतींची संपत्ती दुप्पट केली तरीही हा नुकसान भरून निघणार नाही…मात्र असे असेल तरीही कंपनीचा क्लाउड व्यवसाय वेगाने वाढत असून त्याचा महसूल थेट दुप्पट झाला आहे… गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी या घसरणीनंतर स्पष्ट केले आहे की, AI वरील हा खर्च तात्पुरता नसून भविष्यातील तंत्रज्ञानाचा पाया आहे आणि दीर्घकाळात याचे मोठे फायदे मिळतील…त्यांनी जरी गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरीही सध्या घसरण दिसतच आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts