Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 374 अंकांनी कोसळला, निफ्टी 24 हजारांच्या खाली
बिजनेस

शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 374 अंकांनी कोसळला, निफ्टी 24 हजारांच्या खाली

Share Market Today
21

Share Market Today : भारतीय शेअर बाजारासाठी बुधवारचा दिवस दबावाचा ठरला. जागतिक बाजारातील कमजोर संकेत, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. दिवसअखेरीस सेन्सेक्स 373.93 अंकांनी घसरून 76,570.35 वर, तर निफ्टी 141.35 अंकांनी घसरून 23,914.45 वर बंद झाला.

निफ्टी 24 हजारांच्या खाली ( Share Market Today )

बाजारातील विक्रीमुळे निफ्टी 50 निर्देशांक पुन्हा 24,000 च्या खाली गेला. दिवसभर ऑटो, IT आणि इतर काही क्षेत्रांमध्ये दबाव दिसून आला. मात्र काही निवडक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याने बाजाराने सकाळच्या नीचांकी पातळीवरून काही प्रमाणात सावरला.

हेही वाचा : Jitendra Mishra | राम मंदिर ट्रस्टचे पहिले CEO बनले जितेंद्र मिश्रा; कोण आहेत ते? जाणून

कच्च्या तेलाच्या दरवाढीचा बाजाराला फटका

अमेरिका-इराणमधील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. त्यामुळे Brent crude सुमारे 96 डॉलरच्या पातळीवर पोहोचले. भारत हा कच्च्या तेलाचा मोठा आयातदार असल्याने तेलाच्या किमती वाढल्यास महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढण्याची शक्यता असते. या चिंतेचा परिणाम गुंतवणूकदारांच्या भावनेवर झाला.

कोणते शेअर्स दबावात?

आज Hero MotoCorp, Asian Paints, HDFC Bank, HCL Technologies आणि काही ऑटो-IT शेअर्समध्ये दबाव दिसून आला. दुसरीकडे Coal India आणि काही निवडक शेअर्समध्ये वाढ झाली.

बाजारातील ही घसरण पाहता गुंतवणूकदारांचे लक्ष आता कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक बाजारातील संकेत आणि पश्चिम आशियातील पुढील घडामोडींवर राहणार आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts