Ram Mandir Trust CEO : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची मंदिर ट्रस्टचे पहिले Chief Executive Officer (CEO) म्हणून निवड केल्याची माहिती समोर आली आहे.
राम मंदिर ट्रस्टच्या बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत CEO पदासाठी आलेल्या शिफारसींवर चर्चा करण्यात आली. या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले होते. तब्बल 5,585 अर्जांमधून उमेदवारांची छाननी करण्यात आली आणि अंतिम टप्प्यात 16 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर निवड समितीने तीन नावे ट्रस्टसमोर ठेवली होती.
CEO म्हणून जितेंद्र मिश्रा यांची भूमिका काय असेल? ( Ram Mandir Trust CEO)
राम मंदिर ट्रस्टच्या CEO पदाची निर्मिती मंदिराच्या प्रशासकीय आणि दैनंदिन व्यवस्थापनाला अधिक व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी करण्यात आली आहे. मंदिरातील प्रशासन, कर्मचारी व्यवस्था, विविध कामांचे नियोजन आणि व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या CEOच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे हाताळल्या जाण्याची अपेक्षा आहे. CEO ट्रस्टच्या देखरेखीखाली काम करणार आहे.
हेही वाचा : बाप्पांच्या आगमनाची तारीख ठरली! गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत जाणून घ्या
5 हजारांहून अधिक अर्ज, 16 उमेदवारांची मुलाखत ( Jitendra Mishra )
CEO पदासाठी निवड प्रक्रिया जुलैमध्ये सुरू करण्यात आली होती. उमेदवारांसाठी प्रशासन किंवा वित्त क्षेत्रातील दीर्घ अनुभवासह पदवीची अट ठेवण्यात आली होती. मंदिर व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते.
राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी पहिल्यांदाच स्वतंत्र CEOची नियुक्ती होत असल्याने ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.









