• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • अयोध्येत भाविकांना दिलासा, दर्शनासाठी नवे नियम लागू; राम मंदिराच्या ऑनलाइन पास पद्धतीत मोठा बदल
Top News

अयोध्येत भाविकांना दिलासा, दर्शनासाठी नवे नियम लागू; राम मंदिराच्या ऑनलाइन पास पद्धतीत मोठा बदल

kharat 15

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील (Ayodhya) श्री राम मंदिरात (Shri Ram Temple) भाविकांना गर्दीशिवाय दर्शन होण्यासाठी श्री राम जन्मभूमी ट्रस्ट भाविकांना पास उपलब्ध करून देत असते. तर हे पास श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या वेबसाइटवरून मिळवता येतात. यामुळे भाविकांना गर्दीशिवाय सहजपणे मंदिरात जाता येते. ही व्यवस्था विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे. तर आता अयोध्येत भाविकांना दर्शनासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

हेही वाचा – गुंगीचं औषध दिलं अन् तरुणीवर 4 वेळा केला बलात्कार; अशोक खरातविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

राम मंदिराच्या ऑनलाइन पास पद्धतीत कोणते बदल करण्यात आले?

श्री राम जन्मभूमी ट्रस्टने वेबसाइटवरून श्री रामांच्या विशेष दर्शनाचा पर्याय काढून टाकला आहे. यासोबतच सिस्टीममध्ये इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत. आता वेबसाइटवर सुगम दर्शनासोबतच सामान्य दर्शनाचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. सुगम दर्शनासाठी बनवलेल्या पासमध्ये श्री रामांचं दर्शन, राम परिवार आणि 6 मंदिरांच्या दर्शनाचा समावेश असेल. सामान्य दर्शनाच्या पासमध्ये श्री राम, राम परिवार, शेषावतार मंदिर, सप्त मंदिर आणि कुबेर टिला यांच्या दर्शनाचा समावेश असेल.

नोंदणीची कमाल संख्या पाचपर्यंत कमी करण्यात आली आहे. आतापर्यंत एका पासवर आठ भाविकांना दर्शन घेता येत होते. 8 मे पर्यंतच्या सुगम दर्शन पासच्या सर्व जागा आधीच भरल्या आहेत. ट्रस्टने केलेला हा बदल दर्शन पद्धतीत समानता आणि पारदर्शकता आणण्याचा एक प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे.

राम मंदिर ट्रस्टने असा सल्ला दिला आहे की, सर्व भक्तांनी दर्शनासाठी भारतीय पोशाख परिधान करावा. पुरुषांनी धोती कुर्ता किंवा धोती पायजमा घालावा आणि महिलांनी साडी किंवा पंजाबी ड्रेससोबत दुपट्टा किंवा चुडीदार दुपट्टा परिधान करावा. तथापि, सध्या हे बंधनकारक नाही हा केवळ ट्रस्टचा सल्ला आहे. दरम्यान, प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने भक्त अयोध्येला भेट देत असतात. दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे आता ज्या भक्तांना रांगेत उभे राहायचे नसेल, तर ते ऑनलाइन पास भरू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts