Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • गुंगीचं औषध दिलं अन् तरुणीवर 4 वेळा केला बलात्कार; अशोक खरातविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
Top News

गुंगीचं औषध दिलं अन् तरुणीवर 4 वेळा केला बलात्कार; अशोक खरातविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. त्यामुळे अशोक खरातच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. अशोक खरातला अटक होऊन एक महिना उलटून गेला आहे तरी त्याच्या गुन्ह्यांची यादी काही संपण्याचं नाव घेत नाहीये. अशोक खरातने आत्तापर्यंत अनेक तरूणी, महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी अनेक महिला धैर्याने समोर येत अशोक खरात विरोधात तक्रार दाखल करत आहेत. त्यामुळे खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. आताही खरातचे आणकी एक अश्लील कृत्य समोर आले आहे, ज्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

हेही वाचा – TMCचा दिवा विझण्यापूर्वी फडफडत आहे…, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, केली भाजपच्या विजयाची गर्जना

अशोक खरातवर सहावा गुन्हा दाखल

काल (23 एप्रिल) अशोक खरातला कोर्टाने पाचव्या गुन्ह्यासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. अशातच आता खरातवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात प्रकरणाचा संपूर्ण तपास विशेष तपास पथक (SIT) करत आहे. तर आता एसआयटीने खरातवरील सहाव्या गुन्ह्यासाठी त्याचा ताबा घेतला आहे. आज त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यादरम्यान खरातच्या सहाव्या नव्या गुन्ह्याबाबत सरकारी वकिलांनी धक्कादायक तपशील कोर्टासमोर मांडले.

खरातने तरूणीला कसं अडकवलं आपल्या जाळ्यात?

सरकारी वकिलांनी सांगितलं की, अशोक खरातने एका तरूणीवर चार वेळा अत्याचार केला आहे. दैवी चमत्काराचा खोटा दावा करत आणि तिच्या वैयक्तिक समस्या दूर करतो असं सांगत तिच्यावर खरातने चार वेळा बलात्कार केला आहे. पीडित तरूणीला पाण्यात गुंगीचं औषध देऊन तिच्यावर खरात लैंगिक अत्याचार करत होता, असा खुलासा सरकारी वकिलांनी केला आहे. त्यामुळे आता खरात महिलांवर अत्याचार करण्यासाठी कोणतं गुंगीचं औषध वापरत होता? तसेच त्याने आत्तापर्यंत कोणाकोणाची फसवणूक केली आहे? याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोर्टाकडे खरातच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता कोर्टाने खरातच्या कोठडीत आणखी वाढ केली आहे.

न्यायालयाने खरातच्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत त्याच्या कोठडीत आणखी वाढ केली आहे. आता खरातला सहाव्या गुन्ह्यासाठी 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील तीन दिवस खरातचा मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts