Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • राम मंदिरात चोरी? बृजभूषण सिंहांच्या भीतीनंतर राऊतांचा धाडसी हल्ला; उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला…
Top News

राम मंदिरात चोरी? बृजभूषण सिंहांच्या भीतीनंतर राऊतांचा धाडसी हल्ला; उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला…

Ram Temple Theft Controversy

Ram Temple Theft Controversy : राम मंदिरातील दानपेटीच्या कथित गैरव्यवहार आणि चोरीच्या प्रकरणाने राजकीय वातावरण गरम झाले आहे. भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी “मला सर्व माहिती आहे, पण जीवाला धोका आहे,” असे विधान केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “राम मंदिरातील देणग्यांबाबत उद्धव ठाकरे अस्वस्थ असल्याचे कळल्यापासून आम्ही सर्व अस्वस्थ आहोत. आम्ही राम मंदिरासाठी एक कोटी रुपये देणगी दिली होती. दान पेटीचे चोर कोण आहेत? हे पैसे कोण वारंवार पळवत आहे? सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले? याची चौकशी का होत नाही?” राऊतांनी पुढे टीकास्त्र सोडले, “या देशावर रामाचं राज्य नाही, तर चोराचं राज्य आहे. राम मंदिरात पाच कोटी चोरायला काही वाटत नसेल, तर मतं चोरणे, निवडणुका चोरणे यात त्यांना काय वाटणार? नरेंद्र मोदींनी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत राजकारण केले, आता गप्प का बसले आहेत?

बृजभूषण सिंहांचा धक्कादायक दावा

रामजन्मभूमी आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते आणि गोंडा-कैसरगंजचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, मंदिरातील गैरव्यवहाराबाबत त्यांना बरेच काही माहिती आहे, पण ते सध्या उघड बोलू शकत नाहीत. “मी कमजोर माणूस आहे. सत्य बोललो तर मोठ्या लोकांशी टक्कर होईल,” असे त्यांचे वक्तव्य चर्चेत आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेची अयोध्या मोहीम

संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे आणि ते लवकरच अयोध्येला जाणार आहेत. “आम्ही तिथे जाऊन या प्रकरणाला तोंड फोडू. पैशाची अफरातफर झाल्याचे पुरावे आहेत. मतं चोरतात तसे फुटेजही चोरले आहे,” असे ते म्हणाले. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मात्र या आरोपांना फेटाळले असून, ऑडिट प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे. तरीही विरोधकांकडून सातत्याने चौकशीची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts