Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सुनेची बाॅलिंग, लेकीची फिल्डिंग, सचिन तेंडुलकरने विमानतच चालू केली बॅटिंग
Top News

सुनेची बाॅलिंग, लेकीची फिल्डिंग, सचिन तेंडुलकरने विमानतच चालू केली बॅटिंग

Sachin Tendulkar Flight Cricket Moment

Sachin Tendulkar Flight Cricket Moment : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा क्रिकेटप्रती असलेला निस्सीम प्रेम पुन्हा एकदा सर्वांपुढे आला आहे. वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे आणि ४० वर्षांपर्यंत देशाची सेवा करणारे सचिन यांनी जरी प्रोफेशनल क्रिकेटला अलविदा म्हटला असला तरी क्रिकेटने त्यांना कधीच सोडलेलं नाही. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ते विमानाच्या आत बॅट हातात घेऊन खेळताना दिसत आहेत. ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन यांचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चिला जात आहे.

या व्हिडीओत सचिन यांची सून सानिया चंडोक गोलंदाजी करताना आणि लेक सारा तेंडुलकर फिल्डिंग करताना दिसत आहेत. विमानातल्या मर्यादित जागेतही कुटुंबीयांसोबत क्रिकेटचा आनंद लुटताना सचिन यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. पहिल्या चेंडूवरच सारा वडिलांना बाद करण्याची विनंती करते. त्यावर सचिन तिला उत्तर देतात, “तू मला कधीच बाद करू शकणार नाहीस. मी बॅट उलटी धरली तरच तुला संधी आहे.” पहिल्या प्रयत्नात यश न मिळाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सारा चेंडू पकडून वडिलांना बाद करते. हा संपूर्ण प्रसंग अत्यंत मनोरंजक आणि कौटुंबिक प्रेमाने भरलेला आहे.

कितीही उंचीवर असलो तरी अॅटिट्यूड बदलू नये – सचिन

व्हिडीओसोबत सचिन यांनी लिहिलेलं कॅप्शन देखील चर्चेत आहे. त्याने असं म्हटलंय की, “कितीही उंचीवर असलो तरी अॅटिट्यूड बदलू नये.” या एका वाक्यात त्यांनी आपल्या साधेपणाचा आणि क्रिकेटप्रेमाचा संदेश दिला आहे. विमानातल्या उंचीवरही खेळण्याची तयारी दाखवत सचिन यांनी सिद्ध केलं की, खेळाडूची मानसिकता आणि उत्साह हीच खरी शक्ती असते. हा व्हिडीओ लवकरच लाखो लोकांच्या मनात स्थान मिळवणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

जोरात शॉट मारलात तर विमानाची काच तुटतील – सोशल मिडिया युजर

चाहत्यांनी या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिला आहे. एका युजरने लिहिलं, “सर जरा काळजीपूर्वक खेळा, जोरात शॉट मारलात तर विमानाची काच तुटतील.” दुसऱ्या एकाने म्हटलं, “म्हणूनच तुम्ही क्रिकेटचे देव आहात.” तर काहींनी कुटुंबीयांसोबतचा हा आनंद पाहून भावूक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “पिच आणि बॅट कशी आहे हे महत्त्वाचं नाही, तर खेळणं महत्त्वाचं आहे हे तुम्ही सिद्ध केलात,” अशा शब्दांत अनेकांनी सचिन यांचं कौतुक केलं.

अर्जुन तेंडुलकर आयपीएल २०२६ मध्ये आपल्या गोलंदाजीने लक्ष

सध्या सचिन यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएल २०२६ मध्ये आपल्या गोलंदाजीने लक्ष वेधून घेत आहे. अर्जुनला पुढील सिझन्समध्ये अधिक संधी मिळाव्यात अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे. सचिन यांचा क्रिकेट वारसा पुढे चालवणाऱ्या कुटुंबाला पाहून चाहत्यांना अभिमान वाटत आहे. हा व्हिडीओ पुन्हा एकदा सिद्ध करतो की, सचिन तेंडुलकर केवळ एक क्रिकेटर नाहीत तर लाखो भारतीयांच्या भावनांचा अविभाज्य भाग आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts