Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • सेजलवर केईएम हाॅस्पिटल करणार कारवाई, करिअरची वाट अन् शो बंद होणार?
Top News

सेजलवर केईएम हाॅस्पिटल करणार कारवाई, करिअरची वाट अन् शो बंद होणार?

KEM Action Against Sejal Pawar

KEM Action Against Sejal Pawar : सेजल पवारने काही दिवसांपूर्वी प्रणित मोरेच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर एक जोक केला होता. तेव्हा तिला हा जोक मस्त वाटला. यावर सर्व जण खळखळून हसताना दिसले. या खालच्या दर्जाच्या जोकवरुन सेजल पवारचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स वाढले. तिला वाटलं सर्व मस्त सुरु आहे. एका जोकवर एका रात्रीतच मोठी प्रसिद्धी मिळाली. सेजल या जोकनंतर सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह पाहायला मिळू लागली.

जणू ती एक सेलिब्रिटीच झाली आहे. पण तिला काय माहिती की काही दिवसानंतर हा खालच्या दर्जाचा जोक तिला चांगलाच महागात पडणार आहे. दोन ते तीन दिवसापूर्वी हिमांशूने 370 रुपयांच्या बिर्याणीवरून खालच्या दर्जाचा जोक करण्याचा प्रय़त्न केला. त्याची महिलांबाबतची मानसिकता समोर आली अन् एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर हिमांशूवर कठोर कारवाईची मागणी होऊ लागली. वातावरण चांगलेच तापल्याने हिमांशूच्या कंपनीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.

महिला आणि पुरुषांमध्ये भेदभावाची वागणूक

हिमांशूवर कारवाई झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सेजलवर देखील कारवाई करण्याची मागणी केली. महिला आणि पुरुष असा भेदभाव का? जर एखाद्या पुरुष डॉक्टराने असं वक्तव्य केलं असतं त्याच्यावर देखील कारवाई झालीच असती. मग सेजल पवारवर कारवाई का नाही? असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला. वातावरण तापल्याने मुंबईच्या नोडल सायबर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलामांतर्गत सेजर पवार, प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर घाणेरडं वक्तव्य भोवणार

मात्र सेजलवर दुसरी कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर असं घाणेरडं वक्तव्य केल्यावरुन ठाकरे गट देखील चांगलाच आक्रमक झाला. पेडणेकरांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे सेजल पवार ज्या रुग्णालयात लास्ट ईयरचं शिक्षण घेतेय, त्या केईएम रुग्णालयानं याप्रकरणी सखोल चौकशीचे निर्देश देत, चौकशी समिती स्थापन केली आहे. आमच्यापर्यंत माहिती आली की, सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होतेय.

वरिष्ठ डॉक्टरांची चौकशी समिती स्थापन

आमच्याकडे शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीनं मृतदेहांबाबत आपत्तीजनक टिप्पणी केलीय, याबाबत आम्ही फारच संवेदनशील असून, घडला प्रकार अत्यंत आक्षेपार्ह्य आहे. आम्ही वरिष्ठ डॉक्टरांची चौकशी समिती स्थापन केलीये. त्या शोचा संपूर्ण एका तासाचा व्हिडीओ आहे, जो ते तपासतील आणि त्या विद्यार्थीनीचंही स्टेटमेंट घेतलं जाईल, अहवाल आल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असं केईएम रुग्णालयाचे डीन हरिश पाठक यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts