Millworks Technologies: शेअर बाजारात नुकतीच नोंद झालेल्या मिलवर्क्स टेक्नॉलॉजीज (Millworks Technologies) कंपनीच्या शेअरने गुतंवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाजारात प्रवेश केल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत असून, काही दिवसांतच शेअरची किंमत ३३१ रुपयांवरून ८०० रुपयांच्या पुढे पोहोचली आहे.
सोमवारी कंपनीचा शेअर BSE वर ५ टक्क्यांच्या वाढीसहा ८०२.५० रुपयांवर पोहोचला. सलग पाच सत्रांमध्ये शेअर अपर सर्किटवर राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये या शेअरबाबत उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा: अॅक्शन, कॉमेडी आणि भावनांचा तडका; या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होणार ‘हे’ ४ चित्रपट
IPO किमतीपासून शेअरमध्ये मोठी वाढ
मिलवर्क्स टेक्नॉलॉजीजचा IPO ३३१ रुपये प्रति शेअर या किमतीवर आला होता. २१ जुलै २०२६ रोजी कंपनीचे शेअर बाजारात लिस्ट झाले. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शेअरने ९० टक्क्यांचा प्रीमियम मिळवत ६२८.९० रुपयांवर सुरुवात केली.
त्यानंतर शेअरमध्ये तेजी कायम राहिली आणि सलग अपर सर्किटमुळे किंमत ८०२.५० रुपयांपर्यंत पोहोचली. IPO किमतीच्या तुलनेत पाहता, केवळ पाच दिवसांत शेअरमध्ये १४० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
एअरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्राशी संबंधित असलेल्या या कंपनीचे बाजारमूल्य आता १३६७ कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
IPO ला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद
मिलवर्क्स टेक्नॉलॉजीजच्या IPO ला गुंतवूणकदारांकडून मोठी मागणी मिळालीहोती. कंपनीचा IPO तब्बल २१९.५४ पट सबस्क्राइब झाला.
IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त दोन लॉटसाठी अर्ज करता येत होता. दोन लॉटमध्ये एकूण ८०० शेअर्सचा समावेश होता.
IPO पूर्वी कंपनीतील प्रवर्तकांची हिस्सेदारी ६५.०८ टक्के होती, जी लिस्टिंगनंतर ४७.१८ टक्क्यांवर आली आहे.
मिलवर्क्स टेक्नॉलॉजीज कंपनी काय करते?
नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू झालेली मिलवर्क्स टेक्नॉलॉजीज ही प्रिसिजन इंजिनिअरिंग आणि उत्पादन क्षेत्रातील कंपनी आहे.
रेल्वे, एअरोस्पेस, संरक्षण, मेट्रो, ड्रोन आणि सेमीकंडक्टर उद्योगांसाठी आवश्यक असलेले उच्च अचूकतेचे घटक (High Precision Components) तयार करण्याचे काम कंपनी करते.
कंपनी रेल्वे कोच पार्ट्स, ब्रेकिंग सिस्टम, डोअर मेकॅनिझम, मेट्रो ट्रेन कपलर्स, एअरोस्पेस पार्ट्स, ड्रोन घटक आणि सेमीकंडक्टर उपकरणांसाठी लागणाऱ्या विशेष भागांचे डिझाइन, उत्पादन आणि विकास करते.
कंपनीच्या शेअरमधील अलीकडील तेजीमुळे बाजारात या नव्या लिस्टेड स्टॉकची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. मात्र, शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असल्याने गुंतवणूकदारांनी निर्णय घेताना कंपनीची आर्थिक स्थिती आणि बाजारातील परिस्थितीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.








