Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • अॅक्शन, कॉमेडी आणि भावनांचा तडका; या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होणार ‘हे’ ४ चित्रपट
मनोरंजन

अॅक्शन, कॉमेडी आणि भावनांचा तडका; या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होणार ‘हे’ ४ चित्रपट

New Movie Releases
34
New Movie Releases: २७ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान थिएटरमध्ये चार चित्रपट रिलीज होणार आहे. हा आठवडा हा चित्रपटप्रेमींसाठी खास ठरणार आहे.

चित्रपटप्रेमींसाठी हा आठवडा खास ठरणार आहे. विकेंडला सिनेमागृहात नवीन चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर २७ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अनेक वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सुपरहिरो अॅक्शनपासून ते कौटुंबिक ड्रामा आणि भावनिक कथांपर्यंत विविध प्रकारचे चित्रपट रिलीज होणार आहेत.

हेही वाचा: “कायदे करून प्रश्न सुटणार नाहीत”; परीक्षा विधेयक, शिक्षण व्यवस्था आणि फडणवीसांवर संजय राऊतांचा निशाणा

भाई तेरा स्टार है

राघव जुयाल यांचा आगामी चित्रपट ‘भाई तेरा स्टार है’ हा ३० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॉमेडी आणि कौटुंबिक ड्रामाचा तडका असलेला हा चित्रपट एका अभिनेत्याच्या आयुष्याभोवती फिरतो.

कथेत एक अभिनेता क्रिकेट सट्टेबाजीमुळे आर्थिक संकटात सापडतो. कर्ज फेडण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच दरम्यान बहिणीबाबत सांगितलेल्या एका खोट्या गोष्टीमुळे त्याच्या आयुष्यात अनेक मजेदार आणि अनपेक्षित घटना घडतात.

कॉमेडी, गोंधळ आणि भावनिक प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट राघव जुयालच्या चाहत्यांसाठी खास अनुभव ठरू शकतो. मनोरंजनाचा तडका असलेली ही कथा प्रेक्षकांना कितपत आवडते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

स्पाइडर-मैन: ब्रांड न्यू डे

हॉलिवूडमधील लोकप्रिय सुपरहिरो फ्रँचायझी ‘स्पाइडर-मैन: ब्रांड न्यू डे नवा भाग ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अॅक्शन, थरार आणि सुपरहिरोच्या जगाचा अनुभव घेण्यासाठी चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मोठ्या पडद्यावर जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्स आणि रोमांचक कथा पाहण्याची संधी या चित्रपटातून मिळणार आहे.

ओह माय डॉग

प्राणीप्रेम आणि भावनिक नात्यांवर आधारित ‘ओह माय डॉग’ हा चित्रपट ३१ जुलै रोजी थिएटरमध्ये येणार आहे. यात एका मुलाची आणि एका बेघर कुत्र्याची सुंदर कथा सांगतो.

माणूस आणि प्राणी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते, प्रेम आणि विश्वास यावर आधारित ही कथा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करू शकते. हलकीफुलकी आणि भावनिक कथा पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा चित्रपट योग्य पर्याय ठरू शकतो.

हेही वाचा: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय नेमके कोणाला मिळणार? काँग्रेस नेते काय म्हणाले? जाणून घ्या

दिल दीवाना हो गया

‘दिल दीवाना हो गया’ हा चित्रपट ३१ जुलै रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध, विश्वास आणि त्याग याभोवती फिरणारी ही कथा आहे. राहुल, नैना आणि राज यांच्या आयुष्यातील भावनिक प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

संगीत आणि कौटुंबिक भावनांनी भरलेला हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल असा आहे. वेगवेगळ्या पिढ्यांना जोडणारी कथा असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास अनुभव ठरू शकतो.

या आठवड्यात कोणता चित्रपट पाहायचा?

अॅक्शन आवडणाऱ्यांसाठी ”स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’, कॉमेडी चाहत्यांसाठी ‘भाई तेरा स्टार है’, भाविनक कथा आवडणाऱ्यांसाठी ‘ओह माय डॉग’ आणि कौटुंबिक मनोरंजनासाठी ‘दिल दिवाना हो गया’ हे पर्याय उपलब्ध असतील. म्हणूनच, या आठवड्यात थिएटरमध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रेक्षकांसाठी काही ना काही खास पाहायला मिळणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts