Yeh Rishta Kya Kehlata Hai: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ च्या ८ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये मायरा तिच्या करिअर आणि कबिरबद्दल वाढत चाललेल्या आकर्षणामध्ये अडकलेली दिसली. अभिरा आणि अरमान तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देताना दिसले.
स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या ८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसारित (Yeh Rishta Kya Kehlata Hai) झालेल्या एपिसोडमध्ये मायरा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोंधळ आणि तिच्या करिअरबाबत कुटुंबाची चिंता हा मुख्य विषय राहिला. सध्या मायरा एका द्विधा मनःस्थितीत आहे. एका बाजूला तिला पत्रकारितेच्या अभ्यासावर आणि प्रवेश परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करायचे आहे, तर दुसऱ्या बाजूला कबीरबद्दल वाढत चाललेल्या आकर्षणामुळे तिच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ लागला आहे. (YRKKH latest episode)
एपिसोडची सुरुवातच एका नाट्यमय प्रसंगाने झाली आहे. घरातील कृष्ण मूर्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. यावेळी अभिरा आणि अरमान यांनी मायराला याबाबत विचारले असता तिने ती गोष्ट लपवण्यासाठी दुसरी गोष्ट सांगितली. (Yeh Rishta Kya Kehlata Hai)
हेही वाचा: 40 नंतर फिट राहायचंय? मग ‘या’ ६ बिया रोज खा!
मायरा हुशार आणि प्रामाणिक असल्याचा अरमानला अभिमान वाटला, तर कावेरीनेही ती मूर्ती घरात ठेवण्यास मान्यता दिली. मात्र, ही मूर्ती मिळवून देण्यासाठी कबीरने तिची मदत केली होती, हे मायरा चांगलेच जाणून होती. त्यामुळे या मूर्तीकडे पाहिल्यावर तिला सतत कबीरची आठवण येत होती. (TV serial news)
कबीरच्या प्रेमात पडल्याची कबुली
घरातील या सगळ्या वातावरणातही मायरा पुन्हा पुन्हा कबीरच्या विचारांमध्ये हरवलेली दिसत आहे. कबीरकडून आलेल्या मेसेजबाबत झालेला गैरसमज दूर झाल्यानंतर मायरा काहीशी निराश झाली. मात्र, याचदरम्यान तिने तिची मैत्रीण मुक्तीसमोर कबीरच्या प्रेमात पडल्याची कबुली (Myra Kabir Love Story) दिली.
आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर मायरा आणखी टेन्शनमध्ये होती. कारण अभिरा किंवा अरमान यांनी त्यांच्यातील ही गोष्ट ऐकली तर काय होईल, याची तिला भीती वाटत होती. (entertainment Latest news)
दुसरीकडे, अभिरा आणि अरमान मायराच्या भविष्याबाबत गंभीर आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी तिने एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा, असा सल्ला त्यांनी तिला दिला आहे. Hindi serial latest update
प्रवेश परीक्षेला आता फक्त दहा दिवस उरले असल्याने मायरा हिने पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, यासाठी अभिरा आणि अरमान तिला शिस्तीने तयारी करण्यास सांगत आहेत.
अभिरा आणि अरमान यांना वाटत आहे की मायरा पूर्णपणे आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असून कोणत्याही प्रेमसंबंधांपासून दूर आहे. मात्र, प्रत्यक्षात मायरा सतत कबीरच्या विचारांमध्ये गुंतलेली आहे. ( Yeh Rishta Kya Kehlata Hai )









