• Home
  • मनोरंजन
  • ‘स्पायडर-मॅन’लाही दिली ‘जन नायकन’ने टक्कर; चक्क 15 दिवसांत कमावले 185 कोटी
मनोरंजन

‘स्पायडर-मॅन’लाही दिली ‘जन नायकन’ने टक्कर; चक्क 15 दिवसांत कमावले 185 कोटी

Jan Nayakan Box Office

Jan Nayakan Box Office: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय यांचा बहुचर्चित चित्रपट ‘जन नायकन’ (Jan Nayakan) सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चेचा विषय ठरला आहे. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर विजय यांचा हा शेवटचा चित्रपट असल्याने चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. २३ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या पॉलिटिकल अॅक्शन ड्रामाने पहिल्या दिवसापासूनच कमाईच्या बाबतीत चांगली सुरुवात केली.

समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारत्मक प्रतिसाद मिळालेल्या या चित्रपटाची कमाई दुसऱ्या आठवड्यातही सुरू आहे. मात्र, आता चित्रपटासमोर हॉलिवूडचा बहुप्रतीक्षित “स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे” (Spider-Man Brand New Day) रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिसवर स्पर्धा वाढली आहे. तरीही ‘जन नायकन’ने आपली पकड कायम ठेवली आहे.

हेही वाचा: ही आहे अनोखी बँक! आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी करते हजारो कोटींचा खर्च

15व्या दिवशीही कमाईचा सिलसिला सुरू

बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, ‘जन नायकन’ने प्रदर्शनाच्या 15व्या दिवशी अंदाजे 1.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई 185.15 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

आठवड्यानुसार चित्रपटाची कमाई

पहिल्या आठवड्यात – 153.55 कोटी रुपये
दुसऱ्या आठवड्यात – 31.60 कोटी रुपये
14व्या दिवशी – 2 कोटी रुपये
15व्या दिवशी – 1.60 कोटी रुपये

एकूण कलेक्शन – 185.15 कोटी रुपये

400 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला चित्रपट

‘जन नायकन’मध्ये विजय (Vijay movie) यांच्यासोबत बॉबी देओल, पूजा हेगडे, मामिता बैजू, सत्यन सूर्यन, प्रदीप ई, राघव आणि अनिरुद्ध रविचंदर यांसारखे कलाकार आहेत. चित्रपटातील बॉबी देओल यांच्या नकारात्मक भूमिकेचीही चर्चा होत आहे.

हा चित्रपट जवळपास 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आल्याचे सांगितले जाते. विजय यांनी या सिनेमासाठी मोठे मानधन घेतल्याची चर्चा असून, त्यांचे मानधन सुमारे 220 ते 275 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे वृत्त आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts