Breaking News :
  • Home
  • Top News
  • ही आहे अनोखी बँक! आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी करते हजारो कोटींचा खर्च
ताज्या बातम्या

ही आहे अनोखी बँक! आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी करते हजारो कोटींचा खर्च

Bank of America
Bank of America: जगभरातील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा आणि विविध सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र, अमेरिकेतील एका मोठ्या बॅंकेने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी केलेला खर्च सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ही बँक आपल्या कर्मचाऱ्यांच्या वजन नियंत्रण आणि आरोग्य सुधारण्यासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करत आहे.

ही बँक म्हणजे बँक ऑफ अमेरिका (Bank of America) कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून, विशेषतः वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या GLP-1 औषधांवर मोठा खर्च करत आहे.

GLP-1 औषधांसाठी 250 दशलक्ष डॉलर खर्च

मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ अमेरिका कर्मचाऱ्यांसाठी लठ्ठपाणावरील (Bank of America Employee Health) उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या GLP-1 औषधांवर दरवर्षी सुमारे 250 दशलक्ष डॉलर (अंदाजे 2 हजार 357 कोटी रुपये) खर्च करत आहे.

हेही वाचा: शिक्षण, आंदोलन, सोशल मीडिया… मुंबईत GEN-Z समोर मोहन भागवत यांनी मांडले स्पष्ट विचार

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन मॉयनिहान यांनी या खर्चाची माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वी या प्रकारच्या उपचारांवर कंपनीचा कोणताही खर्च नव्हता. मात्र, आता हा खर्च कर्मचाऱ्यांच्या एकूण आरोग्यसेवा खर्चातील महत्त्वाचा भाग बनला आहे.

2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुविधा

बँक ऑफ अमेरिकेमध्येसुमारे २ लाख ११ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसाठी अब्जावधी डॉलर खर्च करते. केवळ औषधांपुरता मर्यादित न राहता कंपनी आरोग्य मार्गदर्शन, जीवनशैली सुधारणा आणि वजन नियंत्रणासाठी कोचिंगसारख्या सुविधा देखील पुरवते. कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहिल्यास त्याचा फायदा दीर्घकाळ कंपनीलाही होतो, असा बँकेचा विश्वास आहे.

आरोग्य सुधारल्यास दीर्घकालीन फायदा

बँकेच्या मते, GLP-1 औषधांमुळे वजन नियंत्रणासोबतच (Bank of America Employee Health) हृदयरोगासारख्या समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, या औषधांचा वाढता खर्च अनेक कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

काही कंपन्या खर्च नियंत्रणासाठी अशा औषधांचा आरोग्य योजनांमधील समावेश कमी करत असताना, बँक ऑफ अमेरिका मात्र कर्मचाऱ्यांच्या आरोग्यातील गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल, या भूमिकेवर ठाम आहे.

औषधांच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न

वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी बँक औषध कंपन्या आणि आरोग्य सेवा व्यवस्थापन संस्थांशी चर्चा करत असल्याचे सांगण्यात आले आहे. कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, येत्या काळात अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी मधुमेह आणि वजन नियंत्रणासाठी GLP-1 औषधे उपलब्ध करून देण्याचा विचार करत असल्याचेही समोर आले आहे. मात्र, या औषधांच्या किमती आणि वाढता आरोग्य खर्च हे कॉर्पोरेट जगतासमोरील मोठे आव्हान राहणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts