Mohan Bhagwat: मुंबईत सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचा GEN-Z शी संवाद साधला. यात आंदोलन, शिक्षण (education policy), सोशल मीडिया (social media awareness) आणि समलैंगिक विवाहसह (women empowerment) विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मंडळी आहे. चला तर जाणून घेऊयात काय म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मुंबईत आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात GEN-Z तरुणांशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षण, आंदोलन, लोकशाही, सोशल मीडिया, महिला सक्षमीकरण, विवाह संस्था आणि समलैगिंक विवाह (same sex marriage India) अशा अनेक महत्वाच्या विषयांवर आपली भूमिका मांडली.
भागवत म्हणाले की, आजची GEN-Z आणि GEN Alpha पिढी प्रामाणिक असून सत्य बोलण्याची हिंमत ठेवते. ‘मी डोळे बंद करूनही GEN-Z वर विश्वास ठेवू शकतो. ही पिढी आमच्या पिढीपेक्षाही अधिक प्रामाणिक आहे,” असे ते म्हणाले.
लोकशाही व्यवस्थेत आंदोलनाने महत्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, आंदोलन करणे चुकीचे नाही. मात्र ते योग्य आणि शांततापूर्ण मार्गाने व्हायला हवे. “आंदोलन करणारे देशविरोधी असतात, असे म्हणणे योग्य नाही. लोकशाहीत संवाद अत्यंत महत्वाचा आहे. सरकार किंवा लोकप्रतिनिधी जनतेकडे कायम दुर्लक्ष करू शकत नाहीत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षणाच्या मुद्द्यावर नेमकं काय म्हणाले?
शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भागवत यांनी प्रत्येकाला शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. शिक्षणासाठी अर्थसंकल्पातील तरतूद वाढवण्याची मागणी योग्य असल्याचे सांगत त्यांनी शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहू नये, असेही नमूद केले. “शिक्षण हे पैसा कमावण्याचे साधन नसून पुढची पिढी घडवण्याचे माध्यम आहे,” असे ते म्हणाले. तसेच, आंदोलनाशिवायही शिक्षणासाठी 6 टक्के निधी उपलब्ध होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
GEN-Z ना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
सोशल मीडियाच्या वापराबाबत त्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काही गोष्टींवर बंदी घातल्याने त्या पूर्णपणे थांबत नाहीत, तर त्या अवैध मार्गाने सुरू राहतात. त्यामुळे समाजाने स्वतः काही नियम स्वीकारणे अधिक प्रभावी ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
वैयक्तिक आचरणाच्या संदर्भात बोलताना भागवत म्हणाले की
वैयक्तिक आचरणाच्या संदर्भात बोलताना भागवत म्हणाले की, सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या वर्तनाचा समाजावर मोठा परिणाम होत असतो. “मी जे करतो, त्याचे अनुकरण लाखो लोक करतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: भारतात लवकरच लॉन्च होणार iQOO Z11; नवीन चिपसेट आणि दमदार फीचर्ससह करणार धमाकेदार एंट्री
महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात
महिला सक्षमीकरणावर बोलताना त्यांनी प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्याचे नमूद केले. विवाह ही केवळ दोन व्यक्तींची एकत्र राहण्याची व्यवस्था नसून त्यामागे व्यापक सामाजिक जबाबदारीही असते, असे त्यांनी स्पष्ट केले. LS Marathi News Channel
समलैंगिक विवाह
समलैंगिक विवाहाच्या (same sex marriage India) मुद्द्यावर बोलताना भागवत यांनी या विषयासाठी स्पष्ट कायदेशीर चौकट असण्याची गरज व्यक्त केली. तसेच अशा संवेदनशील विषयांमध्ये कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सखोल तपास आणि व्यापक चर्चा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील या संवाद कार्यक्रमात भागवत यांनी तरुणांना सामाजिक जबाबदारी, विवेकपूर्ण विचार आणि सकारात्मक सहभाग यांचे महत्त्व पटवून देत विविध समकालीन विषयांवर आपले विचार मांडले.









