• Home
  • राजकारण
  • घाम फुटला! शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन
Top News

घाम फुटला! शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन

 CJP Stages Protest in Delhic

CJP Stages Protest in Delhic : सध्या सोशल मीडियापासून ते दिल्लीच्या राजकीय वर्तुळापर्यंत एकाच नावाची प्रचंड चर्चा सुरू आहे आणि ते नाव म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला हा मुद्दा आता थेट दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलनाच्या स्वरूपात उतरणार आहे. या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ६ जून २०२६ रोजी दिल्लीतील प्रसिद्ध जंतर-मंतर मैदानावर एका मोठ्या शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा केली आहे. कॉक्रोच नावाने सुरू झालेली ही डिजिटल मोहीम थेट दिल्लीच्या जंतर-मंतरपर्यंत कशी पोहोचली आणि देशातील लाखो विद्यार्थी या चळवळीला आपला पाठिंबा का देत आहेत. याविषयी सर्वात महत्त्वाचे कारण हे तरुणांच्या मनातील उद्रेक असल्याचे सांगितले जात आहे.

कॉक्रोच जनता पार्टी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली एक पॅरोडी म्हणजेच उपरोधिक आणि उपहासात्मक चळवळ आहे. याची सुरुवात मूळचे महाराष्ट्रातील असलेले आणि सध्या अमेरिकेत राहणारे प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि डिजिटल क्रिएटर अभिजीत दीपके यांनी केली. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, नेत्यांच्या वागणुकीवर आणि तरुणांच्या प्रलंबित प्रश्नांवर उपरोधिक पद्धतीने भाष्य करण्यासाठी या नावाची निवड केली. अवघ्या तीन चार दिवसांत सोशल मिडीयावर कोट्यावधी फोलोवार्स या पार्टीने मिळवले.

दिल्लीच्या तख्ताला शह देण्यासाठी काॅक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन

सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोक्रोच जनता पार्टीने आवाज उठवायला सुरुवात केली, मात्र हि पार्टी केवळ सोशल मिडीयावरच राहणार असं वाटत असतांना आता दिल्लीच्या तख्ताला शह देण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी आता दिल्लीच्या मैदानात प्रत्यक्षात उतरणार आहे, ६ जून ला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात आंदोलन करणार असल्याची घोषणा अभिजित दिपके यांनी केलीये.

पेपरफुटीच्या घोटाळ्यांमुळे देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धतीमध्ये झालेला प्रचंड गोंधळ. गेल्या काही महिन्यांत भारतात नीट आणि इतर अनेक अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटले. या पेपरफुटीच्या घोटाळ्यांमुळे देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले. ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून, वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा दिली होती, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. या संपूर्ण घोटाळ्यांनंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी

याच पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने विद्यार्थ्यांच्या या संतापाला आणि आवाजाला एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. या आंदोलनाची सर्वात प्रमुख आणि मोठी मागणी म्हणजे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या सर्व परीक्षा घोटाळ्यांची आणि पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. त्याचबरोबर या घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्याशी असा खेळ होणार नाही, याची हमी सरकारने द्यावी, ही या आंदोलनामागील मुख्य भूमिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts