Pellet Gun : NEET पेपरफुटीमुळे देशभरात अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे..तर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलं आहे..यामुळे दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलंय..सीजेपीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे..20 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी चलो संसद म्हणून आंदोलनाची हाक दिली होती..यावेळी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला..अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या…पोलिसांनी तरुणींचे कपडे फाडल्याचाही आरोप होतोय..मात्र यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर केल्याचा मोठा आरोप होत आहे..काही तरुणांचे यामुळे डोळे निकामी झाल्याचा आरोप आहे…आता राहुल गांधींनी देखील एका आंदोलक तरुणाला समोर आणत पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केलाय..पॅलेट गनच्या वापरामुळे तरुणाचा डोळा निकामी झाल्याचा आरोप केला आहे…त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की, पॅलेट गन काय असते? त्याचा वापर कशासाठी केलं जातं? विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर का करण्यात आला?
Pellet Gun : पॅलेट गन म्हणजे काय? राहुल गांधींचा गंभीर आरोप, विद्यार्थ्याचा डोळा निकामी?
Pellet Gun : देशात किंवा इतर ठिकाणी जेव्हा आंदोलन हिंसक वळण घेतात, जमावाकडून सुरक्षा दलांवर थेट दगडफेक किंवा हल्ला केला जातो, तेव्हा या पॅलेट गनचा ( Pellet Gun ) वापर केला जातो…जम्मू काश्मीरमध्ये पॅलेट गनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप होतो…पण दिल्लीतील आंदोलनात तर विद्यार्थी शांततेने मोर्चा काढत होते..तरूणांनी पोलिसांवर कुठेही हल्ला केला नाही..उलट पोलिसांनीच मुलांना जनावरांसारखं मारलं आहे..तरीही पोलिसांनी मुलांवर पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप आहे…लोकशाहीत आंदोलकांचा थेट जीव घेणे अत्यंत गंभीर मानले जात असल्यामुळे पारंपारिक बंदुकीच्या गोळीबाराला पर्याय म्हणून पॅलेट गन उदयास आली आहे…
सुरुवातीच्या काळात पॅलेट गनचा ( Pellet Gun ) वापर जंगलातील उडणारे पक्षी किंवा लहान प्राण्यांची शिकार करण्यासाठी केला जात असे… एकाच फायरमध्ये हवेत पसरणारे अनेक छर्रे पक्ष्यांना जाऊन लागत असे… मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायल सारख्या देशांनी हिंसक अंतर्गत दंगली दडपण्यासाठी या शस्त्राचा प्रयोग सुरू केला… भारतात 2010 च्या सुमारास काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या भीषण दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर, आंदोलकांचा थेट मृत्यू टाळण्यासाठी केंद्र सरकारने अधिकृतपणे ’12-बोर पंप-ॲक्शन पॅलेट गन’ सुरक्षा दलांच्या ताफ्यात सामील केली…
हेही वाचा : उद्या प्रधानांचा राजीनामा? सरकारनं मागितला 24 तासांचा वेळ, दिल्लीत काय घडतंय?
दिल्लीतील NEET आंदोलनात पॅलेट गन वापरल्याचा आरोप :
What Is The Pellet Gun : पॅलेट गन हे नेहमीच्या रायफलपेक्षा पूर्णपणे वेगळे शस्त्र आहे… सामान्य बंदुकीच्या काडतुसामध्ये एकच मोठी धातूची गोळी असते, जी फायर केल्यानंतर शरीराच्या आरपार जाते… परंतु, पॅलेट गनच्या एका काडतुसामध्ये शिशाचे किंवा इतर जड धातूचे तब्बल 400 ते 500 लहान-लहान गोल छर्रे भरलेले असतात… या छर्र्यांचा आकार मोहरीच्या किंवा साबुदाण्या एवढा असतो…जेव्हा सुरक्षा रक्षक या गनचा ट्रिगर दाबतो, तेव्हा गनपावडरच्या स्फोटामुळे हे शेकडो छर्रे बंदुकीच्या नळीतून प्रचंड वेगाने बाहेर फेकले जातात… नळीतून बाहेर पडताच हे छर्रे सरळ रेषेत न जाता हवेत सर्वत्र पसरतात, ज्याला तांत्रिक भाषेत ‘स्प्रेइंग इफेक्ट’ म्हणतात… यामुळे एकाच फायरमध्ये समोरील एका विशिष्ट व्यक्तीऐवजी काही मीटरच्या परिघात उभ्या असलेल्या संपूर्ण हिंसक गर्दीवर एकाच वेळी मारा होतो…
Rahul Gandhi : दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांना पागवण्यासाठी याच पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप होत आहे…आता हा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही केला आहे…आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला करण्यात आला..पेलेट गनचा वापर का करण्यात आला? पॅलेट गनच्या वापरामुळे आंदोलकाचा डोळा निकामी झालाय…धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षणमंत्री आहेत? असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला..
पॅलेट गनचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम :
कागदावर पॅलेट गनला जरी कमी-घातक म्हटले गेले असले, तरी प्रत्यक्ष जमिनीवरील त्याचे परिणाम अत्यंत विदारक आहेत… हे छर्रे हवेत अनियंत्रितपणे पसरत असल्यामुळे ते मानवी शरीराच्या कोणत्याही नाजूक अवयवावर जाऊन आदळू शकतात.. यात सर्वात मोठा फटका डोळ्यांना बसतो… वेगाने येणारा छर्रा डोळ्याचा कॉर्निया आणि रेटिना पूर्णपणे छिन्नविच्छिन्न करतो, ज्यामुळे दृष्टी कायमची जाते…काश्मीर खोऱ्यातील आंदोलनांच्या वेळी शेकडो तरुण, लहान मुले आणि महिलांना या ‘पॅलेट गनमुळे अंधत्वाचा सामना करावा लागला, अशी माहिती आहे.. ज्यामुळे रुग्णालयांमध्ये स्वतंत्र पॅलेट वॉर्ड तयार करावे लागले होते… याशिवाय, हे लहान छर्रे त्वचेमध्ये आणि स्नायूंमध्ये इतके खोलवर रुततात की, शस्त्रक्रिया करूनही सर्व छर्रे बाहेर काढणे डॉक्टरांना अशक्य होते… शरीरात दीर्घकाळ राहिलेल्या शिशाच्या छर्र्यांमुळे पुढे रक्तात विषबाधा होण्याचा आणि अंतर्गत अवयव निकामी होण्याचाही मोठा धोका असतो… जर पॅलेट गन अत्यंत जवळून फायर केल्यास हे छर्रे पसरत नाहीत, तर एका मोठ्या गोळीसारखे एकत्र येऊन थेट छाती, गळ्यात घुसतात, ज्यामुळे आंदोलकाचा मृत्यू देखील होऊ शकतो…
पॅलेट गनच्या या अंधाधुंद स्वरूपामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ आणि ‘ह्युमन राइट्स वॉच’ यांसारख्या मानवाधिकार संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे… हे शस्त्र गुन्हेगार आणि तिथे चुकून उपस्थित असलेले निष्पाप नागरिक, लहान मुले यांच्यात फरक करू शकत नाही..ते थेट सर्वांना जाऊन लागू शकतात, असा प्रमुख युक्तिवाद या संघटनांनी केला आहे… सुप्रीम कोर्टात आणि जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयातही याविरोधात अनेक जनहित याचिका दाखल झाल्या… न्यायालयाने सुरक्षा दलांच्या अडचणी मान्य केल्या तरी, नागरिकांच्या जीवाची काळजी घेण्याचे आणि केवळ ‘दुर्माळातील दुर्मिळ’ प्रसंगीच याचा वापर करण्याचे निर्देश सरकारला दिले आहे…मात्र तरीही दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर याचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे…आंदोलन दडपण्यासाठी पोलीस आणि सरकार कोणत्या थराला जाऊ शकतात, हे यातून स्पष्ट होते..








