Sonam Wangchuk Protest Abhijeet Dipke: जंतरमंतरवरील आंदोलनस्थळावरून पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कॉकरोच जनता पक्षाचे (Cockroach Janata Party) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी या कारवाईचा निषेध करत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी नवे वळण मिळाले. गेल्या 21 दिवसांपासून आमरण उपोषण करणारे पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सोनम वांगचुक यांना रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. ( Sonam Wangchuk Protest Abhijeet) Dipke
हेही वाचा: ISRO ला मोठा धक्का! 100 हून अधिक शास्त्रज्ञांनी दिले राजीनामे; नेमकं कारण काय?
अभिजीत दीपकेंची सरकारवर जोरदार टीका
दरम्यान, या कारवाईनंतर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसल्याचे सांगत त्यांनी आगामी कार्यक्रमही जाहीर केला.
अभिजित दिपके म्हणाले, ” सोनम सरांना आंदोलनस्थळावरून (Sonam Wangchuk Protest Abhijeet Dipke) शिव्या वगैरे देऊन हटवल्याने हा लढा थांबेल, असा सरकारचा समज असेल तर तो चुकीचा आहे. आंदोलन पूर्वीप्रमाणे सुरू राहील आणि तसेच २० जुलै रोजी आता संसदेकडे नियोजित मोर्चा काढला जाणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “आतापर्यंत आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा (Dharmendra Pradhan Resignation) मागत होतो. मात्र, आंदोलनावर झालेल्या या कारवाईनंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची (Narendra Modi Resignation) मागणीही करणार आहोत.”
आंदोलन सुरूच राहणार
सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी 28 जूनपासून उपोषण सुरू केले असून, NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असले, तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या घडामोडींनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, आंदोलनाची पुढील दिशा आणि 20 जुलै रोजी प्रस्तावित संसद मोर्च्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









