• Home
  • ताज्या बातम्या
  • राहुल-प्रियांका गांधींचे मोदी निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन; आता नीट वाद पेटला…
ताज्या बातम्या

राहुल-प्रियांका गांधींचे मोदी निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन; आता नीट वाद पेटला…

Rahul Gandhi NEET Protest

Rahul Gandhi NEET Protest: नीट प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील ‘७, लोककल्याण मार्ग’ येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला.

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीतील जंतर- मंतर परिसरात झालेल्या आंदोलनदरम्यान परिस्थिती तणावपूर्ण झाली. संसदेकडे जाणारा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची व धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा: अमेरिकेच्या एका निर्णयाने भारताची लॉटरी? या उद्योगांना होऊ शकतो मोठा फायदा

आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला असून, शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेवरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी व पक्षातील इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. नीट प्रकरणातील कथित गैरप्रकार आणि आंदोलकांवरील कारवाईचा निषेध करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

या आंदोलनादरम्यान प्रियांका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते रस्त्यावर बसून निषेध नोंदवत असल्याचे पाहायला मिळाले. नीट पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts