NEET Protest : तरुणांचं दिल्लीत आंदोलन, सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण, प्रकृती खालावली, पण विरोधी पक्ष नेते राहुल गांधी कुठेच दिसले नाही..राहुल गांधींनी आंदोलकांची भेटही घेतली नाही..त्यामुळे राहुल गांधी नेमके कुठं आहेत? राहुल गांधी सोनम वांगचुक यांची भेट का घेत नाहीत? असा प्रश्न निर्माण झाला होता..आज अखेर राहुल गांधींनी आंदोलकांची भेट घेतली आहे..तसंच पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी आंदोलन करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली…तरुणांवर अमानुष लाठीचार्ज झाल्याने त्यांनी पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याचीही मागणी केली..तरूणांवर लाठीचार्ज केल्याने मोदी सरकार आता अडचणीत आल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे..पीएम मोदींची तरूणांमधील लोकप्रियता कमी होताना दिसत आहे, असंही म्हटलं जात आहे…त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की 2029 च्या लोकसभेत भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकतं का? राहुल गांधी 2029 मध्ये पंतप्रधान बनू शकतात का? भाजपच्या विरोधात कसं वातावरण तयार होतं आहे?
NEET आंदोलनात राहुल गांधींचा सहभाग :
NEET Protest : पंतप्रधान मोदींची तरूणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे…तरूणांमध्ये मोदी मोदी नावाचाच जल्लोष पाहायला मिळतो..आज पीएम मोदींचे जे इन्स्टावर 101 मिलियन फॉलोवर्स आहेत..त्यातील जास्तीत जास फॉलोवर्स तरूणच आहेत, असं म्हटलं जातं..मात्र पीएम मोदींनी जी मागील 12 वर्षात प्रतिमा तयार केली होती..ती काहीच दिवसात त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मलीन केल्याची चर्चा आहे..पीएम मोदींवर तरूणांचा प्रचंड विश्वास होता…याच विश्वासामुळे तरूणांनी आणि नागरिकांनी 2014 पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान बनवलं आहे…पीएम मोदींनी तरूणांना आणि नागरिकांना अनेक आश्वासनं दिली..मोदींनी अनेक धडाकेबाज निर्णयही घेतले…त्यामुळे सर्वांनाच वाटलं की असे पंतप्रधान भारतांना परत मिळणे मुश्कील आहे..
पंतप्रधान मोदींनी अनेक आश्वासनं दिली होती, जी पूर्ण झाली नाही…पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत जनतेने भाजपला भरभरून मतदान केलं..पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही चांगलं काम करत असले तरी त्यांच्या पक्षातील काही नेते त्यांना बदनाम करताना दिसत आहेत…पहिल्यांदा पंतप्रधान मोदींना E-20 इंधनाने अडचणीत आणले आहे..नितीन गडकरींनी इथेनॉलचा खूप प्रचार प्रसार केला..पण हे E-20 इंधन फेल ठरल्याचे म्हटलं जात आहे..भाजपचे जे मतदार समजले जातात..जे मध्यवर्गीय लोक आहेत, ते भाजपपासून दूर होताना दिसत आहे..कारण E-20 मुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप होत आहे..कार खराब झाल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे…दुसरं अडचणीत येण्याचं कारण म्हणजे राम मंदिर…राम मंदिरातील दान चोरी प्रकरण चांगलेच गाजले आहे…राम मंदिरातून कोट्यावधी रुपये गायब असल्याचा आरोप होत आहे..यामुळे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत आहे..मात्र अप्रत्यक्षपणे पंतप्रधानांच्या प्रतिमेला देखील याचा धक्का बसत आहे..ज्या राम मंदिरावरून भाजपला देशभरात सत्ता मिळाली..त्याच राम मंदिरातील दान प्रकरणावरून आता भाजप अडचणीत आली आहे..
हेही वाचा : मोदींच्या घराबाहेर राहुल गांधींचं आंदोलन! ‘मोदी-शाह-प्रधान राजीनामा द्या’
NEET Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय प्रतिक्रिया :
भाजपला सर्वात जास्त अडचणीत आणलं आहे ते म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरण…देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET परीक्षा घोटाळ्यामुळे संतप्त झालेले तरुण रस्त्यावर उतरले आहेत. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे परीक्षा पद्धतीवरील विश्वास पार उडाला असून, आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर हजारो विद्यार्थी जमा झाले… ‘चलो संसद’ मार्चच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा बुरखा फाडण्यासाठी पेटून उठलेला हा तरुण वर्ग देशाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
संसद परिसरातील आंदोलनाची पार्श्वभूमी :
मात्र, न्याय मिळावा, यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या या तरुण विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली.. भर रस्त्यात भावी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना पोलिसांकडून झालेल्या जबर मारहाणीचे आणि धक्काबुक्कीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले… डोक्यावर आणि अंगावर पडणाऱ्या काठ्यांचा सामना करत असतानाही मागे न हटणाऱ्या तरुणांच्या आक्रोशाने दिल्लीचे रस्ते हादरून गेले.. सरकारच्या या दडपशाहीच्या आणि क्रूर कारवाईच्या पवित्र्यामुळे विद्यार्थ्यांमधील असंतोष शमण्याऐवजी आणखी तीव्र झाला असून, देशभरातून प्रशासनाच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला जात आहे.
या सर्व प्रकारामुळे देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे.. राहुल गांधींनी थेट जंतर-मंतरवर जाऊन या पीडित आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत या आक्रोशाला मोठे राजकीय व्यासपीठ मिळवून दिले… पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ठिय्या मांडत राहुल गांधींनी शिक्षणमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली… एकेकाळी तरुण वर्गात प्रचंड लोकप्रिय असलेल्या सरकारविरोधात आज तोच तरुण वर्ग रस्त्यावर उतरल्याने केंद्र सरकार पार अडचणीत सापडले असून, या पेटलेल्या आंदोलनाने आगामी राजकीय समीकरणांना थेट आव्हान दिले आहे…
Rahul Gandhi Protest : राहुल गांधींनी पहिल्यांदा थेट आंदोलनात जाऊन तरुणांना भेट दिली नाही..ते सोनम वांगचुक यांनाही भेटले नाही..यामागे एक मोठे कारण सांगितले जात आहे…जर राहुल गांधी आंदोलन स्थळी गेले असते , तर काँग्रेसनेच हे आंदोलन सुरु केले आहे…राहुल गांधी यांनीच वांगचुक यांना उपोषणावर बसवले आहे, असा अजेंडा चालवत या आंदोलनाला चिरडून टाकण्यात आलं असतं, असं म्हटलं जात आहे..त्यामुळे राहुल गांधी या आंदोलनापासून दूर राहिले..मात्र आता पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केल्याने राहुल गांधी थेट मैदानात उतरले आहे..त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय…यामुळे आता केंद्र सरकार बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे..
2029 लोकसभा निवडणुकीवर सुरू झालेली चर्चा :
Student Protest India : राम मंदिरातील दान चोरी प्रकरण, E-20 इंधन, पेपरफुटी प्रकरण , तरुणांवर अमानुष लाठीचार्ज, रस्त्यांवर खड्डेच खडे यामुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे..या सर्व मुद्द्यांना सामोरे जात भाजपला 2029 ची लोकसभा निवडणूक लढावावी लागणार आहे..ज्या ठिकाणी पंतप्रधान या तरुणांपासून दूर जाताना दिसत आहे..तरुणांशी चर्चा करत नाहीये…त्याच ठिकाणी राहुल गांधी ( Rahul Gandhi )हे तरुणांसोबत रस्त्यावर उतरत त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत आहेत..त्यामुळे राहुल गांधींसोबत तरूण मोठ्या प्रमाणात जुडण्याची शक्यता आहे…पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून आतापर्यंत मोठं मोठे काम करत आपली प्रतिमा खूप मोठी केली आहे… भारतात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणाऱ्या नेत्यांमध्ये पीएम मोदींचे नाव समाविष्ट आहे..मोदींची क्रेझ मोठ्या प्रमाणावर असली तरी पक्षातील इतर नेते त्यांना अडचणीत आणत, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत…भाजप विरोधात देशभरात वाढलेला रोष भाजप आता 2029 च्या निवडणुकीपर्यंत कसं कमी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..तसंच 2029 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान बनणार की नाही हे तर येणारा काळ आणि जनता ठरवेल…मात्र तुम्हाला काय वाटतं 2029 मध्ये पंतप्रधान कोणता नेता बनेल.









