Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • ‘ऑपरेशन सिंदरमध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव’; माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
Top News

‘ऑपरेशन सिंदरमध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव’; माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

Pruthviraj Chavan

Operation Sindhur India defeat claim : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याने राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. चव्हाण यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या या दाव्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताला पहिल्याची दिवशी पराभव पत्कारावा लागला होता. कारण भारताचे हवाई दल जमिनीवर अडकून पडले होते. त्यांच्या या दाव्याने नव्या वादाची ठिणगी पडली असून त्याचे आता वणव्यात रूपांतर होताना दिसून येत आहे.

दरमान्य, पृथ्वीराज चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, भारतातील जनतेने याचा स्वीकार करू किंवा नाही, मात्र हीच वस्तुस्थिती आहे. भारताला पहिल्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरदरम्यान पराभवाचा सामना करावा लागला. हेच नाही तर यादरम्यान पाकिस्तानने भारतीय लष्कराची विमानेही पाडली होती. भारतीय लष्कराच्या हातात काहीच राहिले नव्हते. हवाई दल जमिनीवर अडकून पडले होते. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या दाव्यानंतर वादाची मोठी ठिंगणी पडली असून पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, लोकांनी याचा स्विकार करू किंवा नाही ही वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा – कोकाटे आऊट, मुंडे इन? मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट

हवाई दलाचे विमान खालीच थांबून होते

बठिंडा, सिरसा आणि ग्वाल्हेरमधून एखादे जरी विमान उडाले असते तर पाकिस्तान लष्कराकडून ते पाडले जाण्याची 100 टक्के शक्यता होती. या कारणामुळे हवाई दलाचे विमान खालीच थांबून होते, त्यांना उड्डाण करणेही शक्य होत नव्हतं. यादरम्यान बोलताना ते पुढे म्हटले की, अमेरिकेतीलएपस्टाईन फाइल्स‘ 19 डिसेंबर रोजी अमेरिकन काँग्रेसमध्ये सार्वजनिक केल्या जातील, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

जगभरातील अनेक मोठ्या लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्या..

या फाइल्समध्ये उघड होणारी माहिती जगासाठी धक्कादायक असेल आणि त्याचा थेट परिणाम भारतातील राजकारणावर होईल. जेफ्री एपस्टीन नावाच्या एका व्यक्तीने भारतातील काही लोकांसह जगभरातील अनेक मोठ्या लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्या आहेत. ज्यात भारतातील काही लोकांचा समावेश आहे. ती फाईल उघड झाली तर भारतात खळबळ उडेल.

देशातील पंतप्रधान बदलले जाणार..

देशातील पंतप्रधान बदलले जाण्याची शक्यता आहे. नागपूरमधील व्यक्ती पंतप्रधानपदावर विराजमान होतील. हैराण करणारे म्हणजे ते आजही आपल्या त्या दाव्यावर ठाम आहेत. अमेरिकेतीलएपस्टाईन फाइल्स‘ 19 फाईलमध्ये नेमके काय आहे, यावरून आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानाच्या पदावरून गेलेल्या विधानानंतर त्यांन ऑपरेशन सिंदूरबद्दल धक्कादायक दावा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ उडाली, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण पाकिसत्ताची सुपारी घेऊन बोलत आहेत –  चित्रा 

पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहीलेले आहेत. पाकिसत्ताने त्यांना सुपारी दिली आहे, असं वाटतंय. भारतीय सैन्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे. काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्त्यांमधील विश्वास संपला आहे. “ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाला” असे म्हणणारे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे फक्त खोटे नाही, तर थेट देशद्रोही मानसिकतेचे प्रदर्शन आहे. भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी स्वतः दिलेले अधिकृत तपशील काँग्रेस ऐकायला तयार नाही, कारण त्यांना भारतीय सैन्यापेक्षा पाकिस्तानच्या कथनावर अधिक विश्वास आहे, असं भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts