Breaking News :
  • Home
  • Top News
  • घरात घुसून पतीच्या डोळ्यादेखत नवविवाहितेवर आळीपाळीने अत्याचार, बुलढाणा हादरला !
गुन्हा

घरात घुसून पतीच्या डोळ्यादेखत नवविवाहितेवर आळीपाळीने अत्याचार, बुलढाणा हादरला !

Buldhana Crime

Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्री काही चोर एका गरीब मजुराच्या घरात शिरले, पती पत्नीला गळ्याला विळा लावला शेतात ओढत नेले आणि आणि अवघ्या १९ वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीसमोर आळीपाळीने लैंगिक अत्याचार करण्यात आले, अशा अमानुष कृत्याने संपूर्ण मानवतेला काळीमा फासला आहे. काय घडली घटना कोण होते ते नराधम ? त्या मध्यरात्री नराधमांनी कसं केलं थरारक कृत्य ?

घरात घुसून नवविवाहितेवर कथित लैंगिक अत्याचार; पतीसमोर घडला धक्कादायक प्रकार :

Malkapur Crime : १७ जुलै…. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक याठिकाणी सालगडी म्हणून कामाला असलेले नवरा बायको शेतातील कामं आटोपून रात्री जेवण करून झोपी गेले होते. साधारण मध्यरात्रीच्या सुमारास, रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान, जेव्हा संपूर्ण परिसर गाढ झोपेत होता, तेव्हा मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम घराचा दरवाजा तोडून घरात शिरले…. एकाच्या हातात तीक्ष्ण चाकू होता, तर दुसऱ्याच्या हातात शेतात वापरला जाणारा धारदार विळा होता. घरात घुसताच त्यांनी तुमच्याकडे जे काही पैसे, दागिने आहेत ते मुकाट्याने आमच्या हवाली करा, नाहीतर जागच्या जागी संपवून टाकू असा ओरडा करत त्यांनी संपूर्ण घर धुंडाळायला सुरुवात केली. यावेळी भीतीपोटी पतीने स्वतःजवळील ६०० रुपये त्या चोरट्यांना दिले, त्यांनी त्याच्या हातात असणारा मोबाईल फोनही हिसकावून घेतला.

हेही वाचा : देशभरात काय घडलं? आजच्या टॉप बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

पतीला शस्त्राचा धाक दाखवत आरोपींनी केला हल्ला :

Buldhana Crime : चोरीचा डाव फसला, कारण पीडित दाम्पत्य हे गरीब मजूर असल्याने त्यांच्याकडे सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे चोरट्यांना सापडले नाहीत, पैसे नाही पण घरात १९ वर्षांची नवीन लग्न झालेली महिला होती, आरोपींनी विवाहितेला आणि तिच्या पतीच्या गळ्याला विळा लावला आणि, घरातून बाहेर ओढत शेतामध्ये घेऊन गेले. एका आरोपीने पिडीत पतीच्या गळ्यावर धारदार विळा ठेवला आणि त्याला जागचा हालू दिला नाही, दुसऱ्या नराधमाने विवाहितेवर बळजबरी करत अत्याचार केला. पीडित तरुणीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि अब्रू वाचवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला, पण धारदार शस्त्रांच्या धाकासमोर तिचे सर्व प्रयत्न अपुरे पडले. एका आरोपीचे कृत्य संपल्यानंतर, दुसऱ्या आरोपीने पतीला चाकूचा धाक दाखवत पहिल्या आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. दोन्ही नराधमांनी पतीच्या डोळ्यादेखत १९ वर्षीय महिलेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला…..

या भयंकर कृत्यानंतर मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ते दोघेही मोटारसायकलवर बसून घटनास्थळावरून फरार झाले. पिडीत कुटुंबाने मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार सांगितला, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केलाय….

पीडित दाम्पत्य मध्य प्रदेशातील मजूर असल्याची माहिती :

Buldhana Crime : या गुन्ह्यातील पीडित महिला ही केवळ १९ वर्षांची नवविवाहित तरुणी आहे. ती आणि तिचा पती हे मूळचे मध्य प्रदेश राज्यातील बुरहानपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आदिवासी समाजातील हे दोघेही आहेत. हाताला काम नसल्यामुळे या तरुण दाम्पत्याने महाराष्ट्र गाठला होता. अवघ्या काही दिवसांपूर्वीच ते बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक येथे आले होते. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ते सालदार म्हणून काम करत होते.

आरोपींच्या शोधासाठी पाच विशेष पथके तैनात :

पीडितेच्या जबानीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. गुन्ह्याचा माग काढण्यासाठी आणि आरोपींनी मागे सोडलेले पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, आरोपींनी मोटारसायकलचा वापर केल्यामुळे ते आजूबाजूच्या गावातील किंवा महामार्गावरील असू शकतात. आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी ५ विशेष तपास पथके तैनात करण्यात आली आहेत.

Malkapur Crime : या भयंकर घटनेने फक्त मलकापूर तालुकाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, या नराधमांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, कारण या गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक राहिलाय कि नाही हेच समाजात नाहीये, असे गुन्हे जर रोखायचे असेल तर आरोपींना तत्काळ शिक्षा आणि फाशीची शिक्षा होणेच गरजेचे आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts