Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • चंद्रपुरात वाघिणीची दहशत! जंगलात गेलेल्या १३ महिलांवर हल्ला; ४ जणींचा जागीच अंत, नेमकं काय घडलं?
Top News

चंद्रपुरात वाघिणीची दहशत! जंगलात गेलेल्या १३ महिलांवर हल्ला; ४ जणींचा जागीच अंत, नेमकं काय घडलं?

Chandrapur Tiger Attack
46

Chandrapur Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत सिंदेवाही रेंजमधील गुंजेवाही गावाच्या जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी सुमारे ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या  महिलांवर वाघिणीने हल्ला केला. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत आणि शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, सर्व महिला नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता संकलनासाठी १३ महिला  जंगलात गेल्या होत्या. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण आणि अनपेक्षित होता की, चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिस विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा आणि सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. तसेच अधिकाऱ्यांकडून संपूर्ण जंगल परिसरात निगराणी वाढवण्यात आली आहे.प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलांची ओळख कवडा दादाजी मोहुर्ले (४५), अनिता दादाजी मोहुर्ले (४०), सुनीता कौशिक मोहुर्ले (३८) आणि संगीता संतोष चौधरी (५०) अशी झाली आहे. या सर्व महिला गुंजेवाही गावातील रहिवासी होत्या.

या घटनेमुळे स्थानीक नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या मते गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात वाघांचा धुमाकूळ पाहायला मिळत होता. या घटनेची सूचना ग्रामस्थ मंडळींनी वनविभागाकडे दिली पण होती. या घटनेननंतर नागरिकांमध्ये अत्यंत भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार आधी फक्त वाघांचा वावर पाहायला मिळत होते मात्र आता या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts