• Home
  • राजकारण
  • सातारा ड्रग्स प्रकरण! सुषमा अंधारे यांचे थेट एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप
Top News

सातारा ड्रग्स प्रकरण! सुषमा अंधारे यांचे थेट एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप

Satara Drugs Case

Satara drugs case allegations : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. साताऱ्यातील सावरी गावात पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या रिसॉर्टमध्ये ११५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले, असा सनसनाटी आरोप अंधारे यांनी केला. त्यावेळी अंधारे यांनी ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी’ असं न करत या संदर्भातील अनेक पुरावेदेखील माध्यमांसमोर दाखवले. त्यामुळे या दाव्यात काय तथ्य आहे हे येता काळचं सांगेल.

सावरी गावात असलेल्या रिसॉर्ट आणि त्या रिसॉर्टपासून काही अंतरावर असलेल्या शेडचा फोटो सुषमा अंधारे यांनी दाखवला. ‘सावरी गावात रिसॉर्ट आणि शेड आहे. रिसॉर्ट आणि शेडचा तसा अर्थाअर्थी संबंध येत नाही. रिसॉर्ट आणि शेडमध्ये कोणताही रस्ता नाही. पण फोटोत आपल्याला एक पांढरी रेष दिसते. तिथे १२०० मीटरचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता आहे. हा रस्ता महामार्गाला जोडलेला आणि शेडला जोडलेला आहे. या रस्त्याची मागणी कोणी केली होती, हा रस्ता कोणासाठी बांधला गेला. कारण या भागात आसपास कुठेही घरं नाहीत,’ असा आरोप अंधारे यांनी केला आहे.

हेही वाचा – ‘ऑपरेशन सिंदरमध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव’; माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचं आहे

स्थानिकांच्या माहितीनुसार, रिसॉर्टपासून काही अंतरावर असलेल्या शेडमध्ये तीन जण राहायचे. ही शेड गोविंद शिनकरची आहे. त्यानं ती ओंकार डिगेला चालवायला दिली होती. याच शेडवर पोलिसांनी धाड टाकली आणि पोलिसांना अंमली पदार्थांचा साठा सापडला. जवळच असलेल्या रिसॉर्टमधून या शेडमध्ये जेवण जायचं. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचं आहे. त्यांच्या वडिलांचं नाव संभाजी आहे. त्यामुळे प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे भाऊ असावेत, अशी शंका आली. आम्ही याबद्दल साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना विचारलं. तेव्हा त्यांनी प्रकाश शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा संबंध नसल्याचं सांगितलं,’ अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

सातबाऱ्यावर एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही भावाची नावे

‘प्रकाश आणि एकनाथ शिंदे यांच्या वडिलांचं नाव संभाजी आहे. त्यामुळे आम्ही काही सातबारा शोधले. तेव्हा आम्हाला एक वडिलोपार्जित सातबारा मिळाला. त्या सातबाऱ्यावर सुभाष संभाजी शिंदे, प्रकाश संभाजी शिंदे अशी नावं आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या भावांची नावं योगायोगानं तीच आहेत. आणखी एक योगायोग म्हणजे या हॉटेलचं नाव तेजयश असं आहे आणि प्रकाश शिंदेंच्या मुलांची नावं तेजस आणि यश अशी आहेत. हा पण योगायोग असेल,’ असा सविस्तर तपशील अंधारे यांनी दिला.

उपमुख्यमंत्री शिंदे हेच महाराष्ट्राचे पाब्लो एस्कोबार ?

गेल्या काही दिवसांमध्ये कॉंग्रेस पक्षाकडून आम्ही साताऱ्याच्या सावरी गावात 115 कोटींचा ड्रग्ससाठा सापडला, त्याबद्दल बऱ्याच गोष्टी समोर आणल्या आहेत. याच प्रकरणात समोर आलेलं तेज यश रिसॉर्ट हे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भावाचं आहे. ख़ाली जोडलेल्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावर एकनाथ शिंदे आणि प्रकाश शिंदे दोघांचंही नाव दिसतंय. पण कारवाई केलेला प्रकाश शिंदे हा तो नाहीच असं पोलिस म्हणतायेत. हा योगायोगच म्हणावा लागेल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts